Tesla Robot Attacks Engineer: टेस्ला रोबोटचा सॉफ्टवेअर अभियंत्यावर हल्ला- वृत्त
टेक्सास येथील ऑस्टिन परिसरातील टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात (Tesla's Giga Texas Factory) एका सॉफ्टवेअर अभियंत्यावर सदोष रोबोटने हल्ला (Tesla Robot Attacks Engineer) केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना घडल्यानंतर दोन वर्षांनंतर उघडकीस आली आहे.
टेक्सास येथील ऑस्टिन परिसरातील टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात (Tesla's Giga Texas Factory) एका सॉफ्टवेअर अभियंत्यावर सदोष रोबोटने हल्ला (Tesla Robot Attacks Engineer) केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना घडल्यानंतर दोन वर्षांनंतर उघडकीस आली आहे. अॅल्युमिनिअम कारचे भाग हलवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या रोबोने अभियंत्याला गंभीर दुखापत केली. ज्यामुळे कारखान्याच्या मजल्यावर रक्ताचे थारोळे साचले होते, असे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. 2021 च्या अहवालात दुखापतीच्या या घटनेचा खुलासा करण्यात आलाआहे. ही घटना पुढे येताच यंत्रमानवाकडून काम करुन घेताना निर्माण होणाऱ्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कसा झाला हल्ला?
पीडित सॉफ्टवेअर अभियंता, टेस्लाच्या कंपनीत कास्ट अॅल्युमिनियममधून कारचे भाग कापण्यासाठी जबाबदार असलेल्या रोबोट्ससाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करत होता. दरम्यान, त्याच्यावर सदोष अवस्थेत कार्यरत असलेल्या रोबोटने हल्ला केला. कामावर असलेल्या रोबोटची नियमीत देखभाल, दुरुस्ती केली जाते. या देखभाली दरम्यान, तीन रोबोट सदोष आढळले. त्यानुसार त्यातील दोन रोबोर इतरत्र हालवले मात्र त्यातील तिसरा अनावधानाने सक्रिय राहिला. त्यानेच हल्ला केला. या हल्ल्यात अभियंत्याच्या पाठीवर व हाताला जखमा झाल्या आहेत. तर डावा हात फाटला आहे. या दुखापती गंभीर मानल्या जात नसल्या तरी, टेस्लाने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा, Elon Musk यांच्या टेस्ला कारची भारतात लवकरच निर्मिती, PMO द्वारे सरकारी विभागांना विशेष निर्देश)
गीगा टेक्सास येथे सुरक्षा चिंता:
सन 2021 किंवा 2022 मध्ये अधिकृतपणे कोणत्याही रोबोट-संबंधित दुखापतींची नोंद झाली नसली तरी, अहवाल गीगा टेक्सास येथे संभाव्य सुरक्षा चूक घडल्याचे दर्शवतात. यूएस ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन (ओएसएचए) कडे सादर केलेल्या दुखापतीच्या अहवालात सुविधेवर उच्च दुखापतीचे प्रमाण दिसून आले. गेल्या वर्षी 21 पैकी जवळपास एक कामगार जखमी झाल्याची नोंद झाली. हा दर ऑटोमोटिव्ह उद्योगातील 30 कामगारांपैकी एकाच्या सरासरी दुखापतीच्या दरापेक्षा लक्षणीय आहे. (हेही वाचा, New Tesla CFO: टेस्लाने केली भारतीय वंशाच्या Vaibhav Taneja यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती)
सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप:
टेस्लाच्या वर्तमान आणि माजी कामगारांनी आरोप केला आहे की, कंपनी अनेकदा बांधकाम, देखभाल आणि ऑपरेशन्समध्ये तडजोड करते आणि कर्मचाऱ्यांना धोका निर्माण करते. या खुलाशांनी सुविधेतील व्यापक सुरक्षा चिंतेवर प्रकाश टाकला, ज्यामुळे टेस्लाच्या सुरक्षा पद्धतींची जवळून तपासणी करण्यात आली.
2022 मधील घटना:
अहवालात 2022 मधील दुसर्या घटनेचा देखील उल्लेख आहे, जिथे पाण्यात बुडलेल्या-वितळलेल्या-अॅल्युमिनियमच्या घटनेमुळे कास्टिंग क्षेत्रात स्फोट झाला, परिणामी सोनिक बूमसारखा आवाज झाला. या घटनेचे तपशील गीगा टेक्सास येथे सुरक्षा प्रोटोकॉलच्या सर्वसमावेशक मूल्यमापनाची गरज अधिक ठळक करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)