US चे माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासह अन्य नामांकित व्यक्तींचे Twitter अकाउंट हॅक झाल्यानंतर महाराष्ट्र सायबरकडून Advisory जाहीर

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स आणि स्पेसएक्सचे सीईओ अॅलोन मस्क यांचे ट्वीटर अकाउंट्स हॅक झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर खळबळ उडाली असून या दिग्गजांच्या ट्वीटरवर क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात पोस्ट करुन घोटाळ्याच्या उद्देशाने हा प्रकार हॅकर्सकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Cyber Attacks (Image: PTI/Representational)

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स आणि स्पेसएक्सचे सीईओ अॅलोन मस्क यांचे ट्वीटर अकाउंट्स हॅक झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर खळबळ उडाली असून या दिग्गजांच्या ट्वीटरवर क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात पोस्ट करुन घोटाळ्याच्या उद्देशाने हा प्रकार हॅकर्सकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु काही वेळाने या पोस्ट हॅकर्स कडून डिलिट सुद्धा करण्यात आल्याचे दिसून आले. याच दरम्यान आता महाराष्ट्र सायबरकडून अॅडवायजरी नागरिकांसाठी जारी करण्यात आली आहे.(Twitter Accounts Hacked: अमेरिकेमध्ये बराक ओबामा, बिल गेस्ट सह हाय प्रोफाईल अकाऊंट्स हॅक; ट्वीटरचे सीईओ Jack Dorsey यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया)

महाराष्ट्र सायबरकडून जाहीर करण्यात आलेल्या अॅडवायजरी मध्ये असे सांगण्यात आले आहे की, सोशल मीडियात पोस्ट करण्यात आलेल्या एखाद्या माहितीवर डोळेझाकून विश्वास ठेवू नका. तसेच पोस्ट कितपत खरी आणि त्यात सत्यता आहे हे तपासून पहा. ऐवढेच नाही तर सोशल मीडियात द्वेष निर्माण करणे, खोटी माहिती किंवा अफवा पसरवू नका. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या क्रिप्टोकरन्सीबाबत फसवणूकीला बळी पडू नका. युजर्सने अकाउंटसाठी Strong Password सह वेळोवेळी पासवर्ड बदलण्यासह तो 2 स्टेप मध्ये ठेवावा. नागरिकांना त्यांच्या सोशल मीडिया संबंधित काही अडचण येत असल्यास त्यासंबंधित सपोर्ट सेंटरशी संपर्क साधा. तर महत्वाची बाब म्हणजे अशा संशियत प्रकरणांबाबत सायबर विभागाकडे रिपोर्ट करावा.(Twitter अकाउंट हॅकिंग होण्यापासून बचाव करण्यासाठी 'या' टीप्स जरुर लक्षात ठेवा)

दरम्यान, ट्वीटरवर अकाऊंट्स हॅक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील अशाप्रकारे नामी व्यक्तींची अकाऊंट्स हॅक झाली आहेत. बिटकॉईन ही डिजिटल करंसी आहे. त्यांना डिजिटल बॅंकेमध्ये ठेवले जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया

Pune Traffic Advisory For April 14: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात कॅम्प, विश्रांतवाडीसह अनेक ठिकाणी 14 एप्रिल रोजी वाहतूक बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

SSC HSC Exam: जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी संधी; राज्य मंडळाचा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement