दिवाळीपूर्वी LED आणि LCD होणार स्वस्त, मोदी सरकारचे नागरिकांना मोठं गिफ्ट

तसेच दिवाळीच्या सणात विविध वस्तूंवर भरघोस सूट दिली जाते. तत्पूर्वी मोदी सरकारने सुद्धा येत्या दिवाळीपूर्वी एलईडी (LED) आणि एलसीडीच्या (LCD) किंमती कमी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

LED TV | | (Archived, edited, representative images)

दिवाळीच्या सण म्हटलं की नागरिक नव्या वस्तू घेण्यासाठी तयार होतात. तसेच दिवाळीच्या सणात विविध वस्तूंवर भरघोस सूट दिली जाते. तत्पूर्वी मोदी सरकारने सुद्धा येत्या दिवाळीपूर्वी एलईडी (LED) आणि एलसीडीच्या (LCD) किंमती कमी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार असून मोदी सरकारचे हे एक मोठं गिफ्टच आहे. सरकारने ओपन सेल टीव्ही पॅनलच्या आयातीवर 5 टक्के आकारण्यात येणारा सीमा शुल्क काढून टाकला आहे. त्यामुळे आता टीव्ही पॅनलवर कोणताच सीमा शुल्क लागणार नाही आहे. या पॅनलचा उपयोग एलईडी आणि एलसीडी बनवण्यासाठी करण्यात येतो.

मोदी सरकारने एलईडी आणि एलसीटीडीच्या बाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता पॅनलच्या किंमतीत 3 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार आहे. टेलिव्हिजनच्या महत्वाच्या पार्ट्सपैकी पॅनल सुद्धा महत्वाचा हिस्सा मानला जातो. ओपन सेल एलईडी आणि एलसीडीच्या टीव्हीमधील सेल टीव्ही पॅनलवर (15.6 इंच किंवा त्याहून अधिक इंच) कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. त्याचसोबत चिप ऑन फिल्म, प्रिंडेट सर्किट बोर्ड असेंबली आणि सेलच्या आयातीवरील सीमा शुल्क काढून टाकण्यात आले आहे.

तर 30 जून 2017 मध्ये मोदी सरकारने पॅनलच्या आयातीवर 5 टक्के सीमाशुल्क आकारण्यात यावे असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला टीव्ही निर्मात्या कंपन्यांनी कडकडून विरोध केला होता. मात्र आता पॅनलवरील सीमा शुल्क काढून टाकण्यात आला आहे. (खुशखबर! 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा निर्णय)

त्याचसोबत मोदी सरकारने  ई-सिगरेटवर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे आता ई-सिगरेट बनवणे किंवा विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आर्थिक मंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, ई-सिगरेटवरील बंदी म्हणजे त्यासंबंधित उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक , विक्री, वितरण किंवा जाहिरातीवर पूर्णता प्रतिबंध लादण्यात आला आहे