Jio, Airtel आणि Vi चे अनलिमिडेट डेटासह कॉलिंगचे प्लॅनची किंमत 200 रुपयांहून कमी, जाणून घ्या अधिक

मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया कडून आपल्या प्री-पेड प्लॅनच्या किंमतीत वाढ करत आहे.

Reliance Jio, Airtel, Vodafone, Idea | (Photo courtesy: archived, edited images)

एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडियाचे विविध रिचार्ज प्लॅन युजरसाठी कंपनीने लॉन्च केले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया कडून आपल्या प्री-पेड प्लॅनच्या किंमतीत वाढ करत आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त अशा रिचार्ज प्लॅनची मागणी युजरकडून केली जात आहे. तर आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि वोडाफोनच्या अशाच काही स्वस्त प्लॅनमबद्दल आम्ही अधिक माहिती देणार आहोत.(Samsung Galaxy S22 सीरिजची 'या' दिवशी पासून सुरु होणार प्री बुकिंग, ग्राहकांना मिळणार धमाकेदार ऑफर्स)

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा दिला जातो. हा प्लान 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 20GB डेटा मिळणार आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस मिळणार आहेत.

जिओच्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा दिला जातो. परंतु या प्लॅनची ​​वैधता 149 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 4 दिवस जास्त आहे. या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. तसेच, एकूण 24 GB डेटा ऑफर केला जाईल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, डेटा स्पीड 64 kbps पर्यंत कमी होईल.

तसेच जिओ कंपनीचा 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनची 14 दिवसांची वैधता असून अनलिमिडेट कलिंग, 300 मोफत एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या व्यतिरिक्त जिओ टीवी, जिओ क्लाउड, जिओ सिनेमा आणि जिओ सिक्युरिटीची सुविधा मिळणार आहे.(BSNL Recharge Plan: बीएसएनएलच्या 'या' रिचार्जवर मिळेल 60 दिवसांसाठी 100GB डेटा, मोफत कॉलिंगची सुविधा; जाणून घ्या सविस्तर)

तसेच एअरटेलच्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये एकूण 1जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन अनलिमिडेट कॉलिंग आणि मोफत 300 एसएमएससह येणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राइमचे सुद्धा मोफत ट्रायल मिळणार आहे. हॅलो ट्युन्स आणि एअरटेल विंक म्युझिकचा एक्सेस ही मिळणार आहे.

तर वोडाफोन-आयडियाच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. तसेच अनलिमिडेट वॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 21 दिवसांची आहे. परंतु यामध्ये एसएमएसची सुविधा मिळणार नाही आहे. कंपनीच्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा, अनिलिमिडेट कलिंगसह 24 दिवसांची वैधता मिळणार आहे. हा प्लॅन 300 मोफत एसएमएसच्या सुविधेसह येणार आहे.