Aadhaar Card: काय तुमचे आधारकार्ड सुरक्षित आहे? येथे मिळवा संपूर्ण माहिती
आधारकार्ड हे अनेक ठिकाणी ओळख किंवा कायमचा पत्ता म्हणून ग्राह्य धरले जाते.
भारतात आधारकार्ड (Aadhaar Card) हे महत्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जाते. आधारकार्ड हे अनेक ठिकाणी ओळख किंवा कायमचा पत्ता म्हणून ग्राह्य धरले जाते. बॅंकेत खाते उघडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या कामासाठी आवश्यक आहे. आधारकार्ड युनिक आइडेंटिफेकशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआय जारी करते. आधारकार्ड हे डिजिटल आयडी म्हणूनही वापरले जाते. दरम्यान, आधारकार्डचा गैरवापर होत असलेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे तुमचे आधारकार्ड सुरक्षित आहे का? याची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
आधारकार्डशी गेल्या अनेक वर्षांपासून छेडछाड होत अलल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. आधारकार्डच्या माध्यमातून नागरिकांची खाजगी माहिती लीक केली जात असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे. तसेच यामध्ये फेरबद्दल करून आधारकार्डचा चुकीचा वापर केला जात आहे, अशीही खंत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या आधारकार्डचा वापर कुठे होत आहे? याबाबत तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. हे देखील वाचा-एखाद्याचे WhatsApp स्टेटस डाऊनलोड करायचेय? 'या' सोप्प्या टिप्स लक्षात ठेवा
माहिती मिळण्याची सोपी पद्धत-
- सर्वप्रथम https://uidai.gov.in या बेवसाईटला लॉग इन करा त्यानंतर My Addhar क्लिक करा. त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या सेक्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पर्यायवर क्लिक करा.
- त्यानंतर रिडायरेक्टेड पेजवर जा. तिथे तुमचा 12 अंकी आधारकार्ड नंबर CAPTCHA यासह टाका. त्यानंतर ओटीपी सेंडवर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर नंबर ओटीपी पाठवला जाईल.
- पुढील पेजवर जाऊन अगोदरचे ऑप्शन ऑथेंटिकेशन टाईप निवडा आणि ऑल म्हणून डिफॉल्ट सेट करा. पुढील पेडवर गेल्यानंतर तुन्हाला सर्व आधार ऑथेंटिकेशन रिक्वेस्टची यादी दिसेल. यादीला पाडीएफ फॉर्ममध्ये डाऊनलोड करता येते. ही यादी उघड करण्यासाठी पासवर्डची गरज असते. ही यादी बघण्यासाठी तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्म तारिख टाकणे गरजेचे आहे.
- त्यानंतर या यादीमध्ये तुमचे आधारकार्ड तुमचे आधारकार्ड कुठे कुठे वापरले जात आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. या यादीमध्ये तुम्हाला काही संशयास्पद आढळल्यास वाटले तर, तुम्ही यूआयडीएआय ला संपर्क साधून याबाबत तक्रार करू शकतात. याची तातडीने तक्रार घेतली जाणार आहे.
परंतु, यासाठी तुम्हाला 1947 टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागणार आहे. तसेच नागरिकांना help@uidai.gov.in या वेबसाईटवरही आपली तक्रार नोंदवता येणार आहे.