How to Download Hotstar & Watch MI vs KKR Live: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच पाहण्यासाठी कसं डाउनलोड कराल हॉटस्टार? जाणून घ्या
दिनेश कार्तिक, रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या संकट काळात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 2020 हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र, कोविड-19 मुळे यंदा स्पर्धेचे आयोजन भारताऐवजी युएई (UAE) येथे करण्यात आई आहे. जर तुम्हाला घरी बसून आयपीएलचा (IPL) आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय म्हणजे-हॉटस्टार (Hotstar). हॉटस्टार एक लोकप्रिय ऑनलाइन डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपटांसह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडिओ कन्टेन्ट उपलब्ध आहे. Disney+ Hotstar यंदा आयपीएलचे स्ट्रीम पार्टनर आहेत. आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा सामना खेळला जात आहे. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. (How to Download Hotstar: हॉटस्टार अ‍ॅप कसे डाउनलोड करावे? पाहा 'या' सोप्प्या Steps आणि लुटा आयपीएलचा आनंद)

आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी अँड्रॉइड यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे, तर Apple डिव्हाइस यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हॉटस्टार आपण पहिले प्ले स्टोअरद्वारे आणि दुसरे वेब ब्राउझरमधील हॉटस्टार एपीकेद्वारे डाउनलोड करू शकता. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत...

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे.