इन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस

परंतु तरीही सोशल मीडियात असे काही अॅप आहेत ते युजर्सने डाऊनलोड केल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: unian.net)

सध्या सोशल मीडियावरील विविध अॅप किती सुरक्षित आहे याची खात्री केल्याशिवाय डाऊनलोड करु नका असे सांगितले जाते.त्याचसोबत युजर्सच्या माहितीची संबंधित सुरक्षितता बाळगणे हे अॅप डेव्हलपर्सचे काम असते. परंतु तरीही सोशल मीडियात असे काही अॅप आहेत ते युजर्सने डाऊनलोड केल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. तसेच अॅपमध्ये बग असल्यास ही त्या अॅपच्या संदर्भात काही गोष्टींचा वापर योग्य मार्गाने केला जात नाही. तर नुकत्याच एका भारतीय तरुणाने सोशल मीडियावरील तरुणांच्या पसंदीचे इन्स्टाग्राम (Instagram) अॅपमध्ये बग शोधून काढला आहे. त्यासाठी फेसबुक कंपनीने त्याला तब्बल 20 लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे.

लक्ष्मण मुथय्या असे भारतीय तरुणाचे नाव असून तो मूळचा चेन्नई येथील रहिवासी आहे. तसेच लक्ष्मण पेशाने सायबर सिक्युरीटी रीसर्चर आहे. तर लक्ष्मण याने नुकताच इन्स्टाग्राम या जगप्रसिद्ध अॅमधील बग शोधून काढला आहे. इन्स्टाग्रामध्ये आढळून आलेला बग हा युजर्सचा पासवर्ड बदलणे किंवा सहजच अकाउंट हॅक करता येते असे फेसबुकला सांगितले. परंतु थोडी माहिती अपुरी पडली असली तरीही प्रथम फेसबुकला या बगबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे बगमधील कात्री त्रुटी दाखवून देणारे व्हिडिओ, इमेल फेसबुकला पुराव्यानिशी दाखवल्यावर त्यांनी मी शोधून काढलेल्या इन्स्टाग्रामवरील बगवर विश्वास ठेवला असे लक्ष्मण याने म्हटले आहे.(12 वर्षाच्या विद्यार्थिनीने बनवला कपडे घडी करणारा रोबोट, 3 सेकेंदात उरकते काम (Watch Video)

तर इन्स्टाग्राममध्ये दोन बग आढले असून त्यामधील प्रथम म्हणजे युजर्सच्या अकाउंटमधील फोटो पासवर्डचा उपयोग न करता डिलिट करणे असा होता. तसेच दुसरा बगमध्ये असे होते की, फोनमध्ये दुसरे अॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन देण्यात येत होते. त्यामुसार डाऊनलोड केलेल्या अॅपच्या माध्यमातून युजर्सच्या फोटो पाहण्याची परवानगी दिली जात असल्याचे ही लक्ष्मण याने स्पष्ट केले आहे.