Instagram देणार लवकरच Reels डाऊनलोड करण्याचा पर्याय; पहा कसं करायचं Insta Reel Download!

हळूहळू भारतासह अन्य भागातही हे फीचर खुलं केले जाईल.

Instagram (PC - pixabay)

इंस्टाग्राम (Instagram) सध्या अनेकांसाठी शॉर्ट व्हिडिओ अर्थात रिल्स (Reels) शेअर करण्याचं सर्वात आवडतं सोशल मीडीया प्लॅटफॉर्म झालं आहे. मेटा च्या मालकीच्या या अ‍ॅप वर 2.35 बिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स दरमहा जगभरात आहेत. केवळ भारतातच लाखो क्रिएटर्स कडून दिवसाला 6 लाख रिल्स पोस्ट केल्या जातात. या व्हिडिओ शेअरिंग प्रकाराला जगभरात मोठी लोकप्रियता असूनही अद्याप इंस्टाग्रामने रिल्स डाऊनलोडचा पर्याय दिलेला नाही. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही इंस्टा युजर्सना रिल्स डाऊनलोड करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Adam Mosseri, इंस्टाग्रामचे हेड यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये आता युजर्सना रिल्स डाऊनलोड करता येणार आहे. हे रिल्स त्यांच्या कॅमेरा रोल मध्ये सेव्ह केले जाणार आहेत. हे सेव्ह केलेले रिल्स इतर अ‍ॅप्स वर देखील शेअर करता येणार आहेत.

क्रिएटर्सना अधिक नियंत्रण देताना, इंस्टाग्राम आता त्यांनाच रिल्स डाऊनलोड करण्यासाठी फीचरला परवानगी देण्यासाठीचे अधिकार दिले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांची इच्छा नाही त्या क्रिएटर्सचे रिल्स डाऊनलोड केले जाणार नाही. WhatsApp Screen Sharing Feature: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आणणार स्क्रिन शेअरिंग फिचर; पहा कसा होणार त्याचा वापर .

कसं डाऊनलोड करू शकाल रील्स?

इंस्टाग्राम ओपन करा. तुम्हांला जे रिल डाऊनलोड करायचं आहे त्यावर क्लिक करा.

शेअर आयकॉन वर टॅब करा.

Add to story" चा पर्यय निवडा.

रील्स वर झूम करा. ते स्टोरीच्या लेआऊट पर्यंत झूम करत राहा.

थ्री डॉट असलेल्या बटण वर टॅब करा. त्यानंतर सेव्हचा पर्याय निवडा.

आता फोनच्या स्टोरेज मध्ये रुमचं रिल सेव्ह झालेलं असेल.

Mosseri यांनी माहिती देताना टिकटॉक प्रमाणे इंस्टाग्राम वर डाऊनलोड केलेल्या रिल्स वर वॉटरमार्क असेल की नसेल हे सांगितलेले नाही. सध्या हे फीचर केवळ अमेरिकेत उपलब्ध असणार आहे. हळूहळू भारतासह अन्य भागातही हे फीचर खुलं केले जाईल. सध्या भारतीय युजर्स इंस्टा रिल्स डाऊनलोड करण्यासाठी अन्य थर्ड पार्टी अ‍ॅपप्सवर अवलंबून आहेत.