Infinix Hot 10 स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार 5200mAh च्या बॅटरीसह 5 कॅमेरे, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

फोन सिंगल स्टोरेज वेरियंट 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येणार आहे. या स्मार्टफोनची भारतातील सुरुवाती किंमत 9,999 रुपये आहे.

Infinix Hot 10 (Photo Credits-Twitter)

Infinix Hot 10 स्मार्टफोन भारतात आज लॉन्च करण्यात आला आहे. फोन सिंगल स्टोरेज वेरियंट 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येणार आहे. या स्मार्टफोनची भारतातील सुरुवाती किंमत 9,999 रुपये आहे. स्मार्टफोनच्या अन्य स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एकूण 5 कॅमेरे दिले जाणार आहे. तसेच फोनला पॉवर देण्यासाठी 5200mAh ची बॅटरी मिळणार आहे. कंपनीने Infinix Hot 10 स्मार्टफोन सिंगल कलर ऑप्शन Moonlight Jade मध्ये उतरवला आहे.(भारतात येत्या 6 ऑक्टोबरला लाँच होणार Poco C3 स्मार्टफोन, कंपनीने ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती)

Infinix Hot 10 चा पहिला सेल येत्या 16 ऑक्टोंबरला सुरु होणार आहे. ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart येथून फोन खरेदी करता येणार आहे. सेल दरम्यान युजर्सला  Infinix Hot 10 स्मार्टफोन 1,111 रुपये Monthly No Cost EMI ऑप्शनच्या माध्यमातून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या व्यतिरिक्त फोन काही बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास त्यावर डिस्काउंट ही दिला जाणार आहे. त्याचसोबत कंपनीकडून एक्ससेंज ऑफर ही मिळणार आहे.

इनफिनिक्स हॉट 10 स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. याचा स्क्रिन टू बॉडी रेश्यो 91.5% आहे. तर स्क्रिन Brightness 480nit सह येणार आहे. तसेच फोनचा डिस्प्लेसाठी दिलेला अस्पेक्ट रेश्यो 20:5:9 असा आहे. MediaTek Helio G70 प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये हायपर गेम टेक्नॉलॉजी सुद्धा दिली गेली आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड XOS 7.0 वर काम करणार आहे. (Xiaomi ने लॉन्च केली मेड इन इंडिया असलेली Mi Power Bank 3i, ग्राहकांना 899 रुपयांत खरेदी करता येणार)

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Hot 10 स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याची प्रायमरी लेंस 16MP, 2MP चे दोन आणखी लेंस मिळणार आहेत. तसचे लो-लाइट सेंसर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी युजर्सला फ्रंटला 8MP सिंगल कॅमेरा मिळणार आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येणार आहे. Infinix Hot 10 मध्ये लीथियम लोहाची 5200mAh ची बॅटरी दिली गेली आहे.