स्मार्टफोन मधील IMEI क्रमांक तपासून पाहायचा असल्यास 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

ज्यानुसार तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन कमी किंमतीत नवा फोन खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज ऑफर दरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोनचा IMEI नंबर असतो.

Representational Image (Photo Credit: PTI)

सध्या नव्या स्मार्टफोनवर एक्सजेंच ऑफरची सुविधा दिली जात आहे. ज्यानुसार तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन कमी किंमतीत नवा फोन खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज ऑफर दरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोनचा IMEI नंबर असतो. जो एंटर केल्यानंतर तुम्हाला जुन्या फोनवर दिल्या जाणाऱ्या ऑफर बद्दल कळू शकणार आहे.परंतु IMEI क्रमांक कशा पद्धतीने तपासून पाहता येईल हे तुम्हाला माहिती आहे का? तर काही असे युजर्स आहेत ज्यांना IMEI क्रमांक कसा तपासून पहावा हे सुद्धा माहिती नाही. याबद्दलच आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.

प्रथम IMEI क्रमांक काय आहे हे आपण समजून घेऊयात. तर कोणतेही डिवाइसचे प्रोडक्शन करते वेळी यामध्ये एक युनिक क्रमांक दिला जातो. त्यालाच IMEI क्रमांक असे म्हटले जाते. म्हणजेच International Mobile Equipment Identity त्याचा फुलफॉर्म आहे.त्यामुळे जर तुमचा स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्यावेळी तुम्ही IMEI क्रमांकाची मदत घेऊन फोन ट्रॅक किंवा ब्लॉक करता येणार आहे.(WhatsApp Privacy Policy FAQs Answered: व्हॉट्सअॅप मध्ये तुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का? काय सांगते अॅपची New Privacy Policy? जाणून घ्या)

Apple, Android युजर्सला 'या' पद्धतीने IMEI क्रमांक तपासून पाहता येईल

-सर्वात प्रथम आपल्या फोनच्या कॉलिंग सेक्शन येथे जाऊन क्रमांक डायल करण्याचे ऑप्शन सुरु करा.

-डायल पॅडमध्ये तुम्हाला *#06# डायल करावा लागणार आहे.

-हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर IEMI नंबर दिसून येणार आहे.

-तुम्ही हा क्रमांक नोट करुन घ्या किंवा त्याचा स्क्रिनशॉट घेऊन तो सेव्ह करा.

IEMI क्रमांक तपासून पहाण्याची दुसरी पद्धत जाणून घ्या

-आयफोनमध्ये IEMI क्रमांक तपासून पहाण्यासाठी Settings मध्ये जा.

-तेथे तुम्हाला General मध्ये दिलेल्या About वर क्लिक करा.

-About सेक्शनमध्ये तुम्हाला IEMI क्रमांक दिसून येईल.

-तसेच सर्वात खाली About हा ऑप्शन ही दिसेल.

-About वर क्लिक केल्यानंतर तेथे स्टेटर ऑप्शन दिसणार आहे.

-स्टेटवर क्लिक केल्यानंतर IMEI क्रमांकासंबंधित तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

तर वरील सोप्प्या स्टेप्स वापरुन तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा IEMI क्रमांक तपासून पाहता येणार आहे.