स्मार्टफोन स्लो झालाय? मग 'या' सोप्या टिप्सने वाढवा स्मार्टफोनचा स्पीड

स्मार्टफोन स्लो चालतोय? त्यामुळे तुम्हीही त्रस्त आहात? ही समस्या आपल्यापैकी अनेकांना असते.

Representational Image (Photo Credit: File Photo)

स्मार्टफोन स्लो चालतोय? त्यामुळे तुम्हीही त्रस्त आहात? ही समस्या आपल्यापैकी अनेकांना असते. सुरुवातीला मस्त चालणारे फोन कालांतराने स्लो होऊ लागतात. याचा प्रयत्य तुम्हालाही आला असेल. अॅनरॉईड स्मार्टफोन्स स्लो होण्याची तर अनेक कारणे आहेत. पण या टिप्समुळे तुमचा स्लो झालेला स्मार्टफोन पुन्हा चांगली गती घेऊ लागेल. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या खास टिप्स...

अॅप्स, वॉलपेपर आणि इतर अनावश्यक गोष्टी डिलीट करा

फोनची स्टोरेज क्षमता लक्षात घेऊनच अॅप्स इंस्टॉल करणे गरजेचे आहे. अॅप्सचा भडिमारही स्मार्टफोन स्लो होण्यास कारणीभूत ठरतो. फोनमधील किती अॅप्स खरंच तुम्ही वापरता, याचा विचार करा. त्यानुसारच अॅप्स मोबाईलमध्ये ठेवा. अनावश्यक अॅप्स डिलिट करा. फोनमध्ये असे काही प्री-लोडेड अॅप्स असतात. जे तुम्ही इच्छा असूनही डिलिट करु शकत नाही. अशा वेळी त्यांना डिसेबल करणे योग्य ठरेल. गुगल प्ले स्टोअर मध्ये अनेक लाईव्ह वॉलपेपर असतात. फोनमधील अधिक प्रमाणातील लाईव्ह वॉलपेपर्समुळे मोबाईल स्लो होतो. त्यामुळे फोनमध्ये नॉर्मल वॉलपेपर ठेवा. लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यासाठी खास '४' टिप्स !

cache क्लिअर करणे गरजेचे

एखादे अॅप्स वारंवार वापरल्यास त्यात cache एकत्रित व्हायला सुरुवात होते. स्मार्टफोन स्लो होण्याचे हे देखील एक कारण आहे. त्यामुळे जे अॅप तुम्ही सर्वाधिक वापरता त्याचे cache नियमितरित्या डिलिट करा. cache क्लिअर केल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही हे अॅप वापराल तेव्हा पुन्हा cache एकत्रित व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे cache क्लिअर करण्याचा सोपा पर्याय म्हणजे cache क्लिअर करण्यासाठी सर्वप्रथम Settings>Apps मध्ये जा. त्यात ज्या अॅपचा cache क्लिअर करायचा आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर 'Clear cache'या पर्यायावर क्लिक करा. हरवलेला स्मार्टफोन Google Maps च्या मदतीने 'असा' शोधा; 4 सोप्या स्टेप्स

इनबिल्ड स्टोरेज क्लिअर करा

फोन स्लो होऊ नये म्हणून टोटल इनबिल्ड स्टोरेजमध्ये 10-20% जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. इनबिल्ड स्टोरेज कमी करण्यासाठी इंटरनल स्टोरेजमधील फोटोज, म्युझिक, व्हिडिओ फाईल्स मायक्रो एसडी कार्डमध्ये मूव्ह करा. काही ठराविक अॅप्स देखील तुम्ही इनबिल्ट स्टोरेजमधून कार्डमध्ये मूव्ह करु शकता. Settings>App मधून फाईल्स मूव्ह करु शकता.

फर्मवेयर अपडेट करा

स्मार्टफोनमध्ये फर्मवेयर अपडेच केल्याने फोनमध्ये काही प्रकारच्या सुधारणा दिसून येतात. यात प्रामुख्याने परफॉर्मेस ऑप्टिमाईजेशनचा समावेश आहे. तुमचाही स्मार्टफोन स्लो चालत असल्यास कंपनीकडून फोनला सॉफ्टवेअर अपडेट मिळते की नाही याची खात्री करुन घ्या. यासाठी Settings>System>About>Software Updates मध्ये जा. सॉफ्टवेअर अपडेट मिळत असल्यास फोन अपडेट करण्यापूर्वी बॅकअप अवश्य घ्या.

अॅनिमेशन डिसेबल करा

अॅनिमेशन्स प्रामुख्याने मेन्यू, अॅप ड्राअर्स आणि अन्य इंटरफेस लोकेशन्समध्ये ग्राफिकल ट्राजिशनमध्ये काम करतो. स्मार्टफोन वापरताना अॅनिमेशन अॅक्टिव्ह असते. यामुळे फोनचा वापर अधिक सुकर होतो. मात्र फोन स्लो होवू लागल्यास अॅनिमेशन बंद करा. यासाठी तुम्हाला 'Developers options'मध्ये जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला सेटिंग्समध्ये सापडेल. त्यात Developers options मध्ये तुम्हाला अॅनिमेशन दिसू लागेल ते बंद करा.