Instagram स्टोरी मध्ये लिंक द्यायची असेल तर 'या' सोप्प्या ट्रिकचा वापर करा

Instagram (Photo Credits-Twitter)

इंस्टाग्राम हे जगभरातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्सपैकी एक आहे, जे Google Play Store वर एक अब्जाहून अधिक डाउनलोड आहे. आपल्यापैकी आपली मित्रमंडळी किंवा घरातील नातेवाईक हे इन्स्टाग्रामवर आपल्या दैनंदिन जीवनात अपडेट देण्यासाठी दररोज फोटो, व्हिडिओ, स्टोरीज आणि बरेच काही पोस्ट करत असतात. तर काही लोक त्याचा वापर त्यांच्या व्यवसायासाठी आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी करतात. प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या  प्रमोशनल तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे स्टोरीवर लिंक देणे. यामुळे तुमच्याकडे नागरिक आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या इंस्टाग्राम वरील स्टोरीत लिंक द्यायची असेल तर काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

आपल्या स्टोरीमध्ये लिंक द्यायची असेल तक हे फक्त काही अकाउंटसाठीच लिमिटेड आहे. ज्यासाठी युजर्सकडे कमीतकमी 10 हजार फॉलोअर्स असावे लागता. तुमचे अकाउंट बिझनेस किंवा क्रिएटरच्या रुपात रजिस्टर ही असावे लागते. एका स्टोरीत तुम्ही फक्त एकच लिंक देऊ शकता.(डिलिट झालेली Instagram Post रिकव्हर करण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा)

इंन्स्टाग्रामवरील स्टोरीत या पद्धतीने द्या लिंक

-प्रथम तुम्ही इंन्स्टाग्राम सुरु करा आणि Add Story ऑप्शनमध्ये क्लिक करा.

-आता एका फोटो घेत तो इंस्टाग्रामवरील स्टोरीत अॅड करा

-स्टिकर्स ट्रे सुरु करत त्यावर वरील बाजूस स्टिकर्स ऑप्शनवर क्लिक करा

-Stories stickers tray च्या आतमध्ये स्टिकर सर्च करा

-URL ऑप्शनवर टॅप करा

-आता त्यामध्ये तुम्हाला जी लिंक द्यायची आहे ती द्या

-आता Done ऑप्शनवर क्लिक करा आणि स्टोरी शेअर करा.

तर फिडपोस्ट आणि रिल्ससाठी इतर युजर्ससोबत कोलॅब्रेशन करण्याचे नवीन फिचरवर इंस्टाग्राम सध्या टेस्टिंग करत आहे. या फिचरचे नाव Collab असे असेल. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या फिडपोस्ट आणि रिलसाठी एका दुसऱ्या युजरला इन्वाईट करु शकाल. त्यामुळे हा कन्टेंट दोन्ही युजर्सच्या फॉलोअर्संना दिसेल. जर समोरील युजरने तुमची रिक्वेस्ट अॅस्पेट केली तर तो कन्टेंट दोघांच्या प्रोफाईलवर शेअर होईल. यासोबतच दोन्ही युजर्सच्या फॉलोअर्सच्या फिडमध्ये हा कन्टेंट दिसेल आणि दोन्ही युजर्स या कन्टेंटला दिलेला फिडबॅक पाहू शकतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now