कुरियर ट्रॅक करणे पडू शकते महागात, हॅकर्स खोटे SMS आणि E-Mail पाठवून करतायत पैशांची फसवणूक
कारण सध्या हॅकर्स तुमच्या बँक खात्यामधील पैसे चोरी करण्यासाठी कुरियर सर्विसचा आधार घेत आहेत.
कुरियर सर्विसचा (Courier Service) वापर करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण सध्या हॅकर्स तुमच्या बँक खात्यामधील पैसे चोरी करण्यासाठी कुरियर सर्विसचा आधार घेत आहेत. तसेच खोटे एसएमएस किंवा ईमेल पाठवून नागरिकांची दिशाभुल करत कुरियर ट्रॅकिंग बाबत माहिती देऊ करतात. पण नागरिकांची दिशाभुल करुन पैसे चोरी करण्यासाठी Fedex किंवा अन्य प्रसिद्ध कुरियर सर्विस सारखा मेसेज पाठवतात. हॅकर्सकडून युजर्सला त्यांच्या नावे मेसेज पाठवला जात असून त्यांची फसवणूक होत असल्याचे सुद्धा कळून येत नाही.
खोट्या ईमेल किंवा मेसेज मध्ये युजर्सच्या नावासह कुरियर ट्रॅकिंग कोड दिला जातो. तसेच एक URL पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगतात. या लिंकवर युदर्सला त्याची अधिक माहिती द्यावी लागत असून त्यात बँक खात्यासंबंधित माहिती सुद्धा विचारली जाते. ही माहिती देत असता युजर्स क्षणाचा विचार न करता ते अपडेट करतो. अपडेट केल्यानंतर हॅकर्सकडे ही सर्व माहिती उपलब्ध झाल्यास अवघ्या काही वेळातच युजर्सच्या बँक खात्यामधून रक्कम काढली गेल्याचा मेसेज येतो. हा सर्व प्रकार फिशिंग सारखाच आहे. फिंशिंग हा सर्वात जुना आणि सोपा मार्ग हॅकिंगसाठी असल्याचे मानले जाते.(WhatsApp वर खोटे मेसेज व्हायरल, चुकून सुद्धा त्यावर क्लिक करु नका)
याबाबत फेडएक्स यांनी सुद्धा नागरिकांचा चेतावणी दिली आहे. तसेच फेडएक्स कधीच व्यक्तीचा खासगी महिती किंवा बँक खात्याबाबत माहिती विचारत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा कुरियर ट्रॅकिंग बाबत खोटा मेसेज किंवा ईमेल आल्यास abuse@fedex.com तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.