फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलचे नवे Shoelace App; नेटवर्क नसतानाही वापरण्याची सोय, जाणून घ्या वैशिष्ठ्ये

पुन्हा शिरकाव करण्यासाठी गुगल (Google) ने आपले नवीन सोशल मीडिया अॅप शूलेस (Shoelace) लॉन्च केले आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, वापरकर्ते एकमेकांना ऑफलाइन कनेक्ट होऊ शकणार आहेत.

Shoelace App (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या सोशल मिडिया लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, त्यामुळे लोकांचे जीवनही पूर्णतः बदलून गेले आहे. यात आता पुन्हा शिरकाव करण्यासाठी गुगल (Google) ने आपले नवीन सोशल मीडिया अॅप शूलेस (Shoelace) लॉन्च केले आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, वापरकर्ते एकमेकांना ऑफलाइन कनेक्ट होऊ शकणार आहेत. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गुगलच्या इन-हाउस टीम एरिया 120 युनिटद्वारे डिझाइन केलेले आहे. या सोशल मीडिया अॅपचे मुख्य लक्ष्य लोकांना वास्तविक जीवनात गुंतवून ठेवणे हे आहे.

या प्लॅटफॉर्मवर लोकांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी, आवडीच्या कृती यांद्वारे तुम्ही लोकांशी जोडले जाणार आहात. तसेच तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कनेक्ट होण्याची, मैत्री करण्याची खास सोय यामध्ये असणार आहे. प्रत्येकवेळी कम्युनिटी जॉईन करताना तुम्हाला व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असणार आहे. सध्या गुगल शूलेस फक्त इन्व्हाईट ओन्ली बेसिसवर, अमेरिकेत उपलब्ध आहे. हे सोशल मीडिया अॅप Android आणि iOS अशा दोन्हीला सपोर्ट करेल. अमेरिकेमधील टेस्टिंग यशस्वी झाल्यावर इतर ठिकाणी हे रोल आऊट केले जाईल. (हेही वाचा: Google लवकर लॉन्च करणार 'हे' मोठे 5 फिचर्स, युजर्संना होणार फायदा)

या सोशल मीडिया अॅपमध्ये सामील होण्यासाठी, वापरकर्त्यांकडे गुगलचे खाते असणे आवश्यक आहे. जे लोक नव्या ठिकाणी अथवा नव्या शहरात आहेत किंवा ज्यांना आजूबाजूंच्या परिसराची काही माहिती नाही अशा लोकांसाठी हे App खूपच फायद्याचे ठरणार आहे. गुगलने याआधी त्यांचे गुगल प्लस (Google+) हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद केला होता. त्यानंतर आता हा नवीन प्लॅटफॉर्म फेसबुक ला तगडी टक्कर देईल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement