Facebook सारखेच Google लवकरच लाॅन्च करणार स्मार्टवॅाच, जाणून घ्या अधिक
फेसबुकचे नाव बदलून मेटा करण्यात आले आहे. काही काळापूर्वी फेसबुक स्मार्टवॉचची माहिती लीक झाली होती. पण फेसबुकचे स्मार्टवॉच अद्याप लाँच झालेले नाही. नवीन लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हे 2022 मध्ये मेटा नावाने लॉन्च केले जाईल. दरम्यान, आणखी एका टेक कंपनी गुगलच्या नव्या स्मार्टवॉचची घोषणा करण्यात आली आहे. त्याची थेट टक्कर मेटा वॉचशी होणार असल्याचे मानले जाते. सध्या गुगलने आपल्या पहिल्या स्मार्टवॉचची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण द इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, गुगल आपल्या स्मार्टवॉचवर काम करत आहे. जे पुढील वर्षी 2022 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. कंपनीचे हे पहिले इन-हाऊस स्मार्टवॉच असेल, असा दावा करण्यात आला आहे. परंतु, फीचर्सबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, पिक्सेल सीरिज अंतर्गत स्मार्टवॉच गुगलवरून सादर केले जाऊ शकते. गुगलनेही या सीरिजअंतर्गत स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नवीन पिक्सेल स्मार्टवॉच प्रथम निवडक देशांमध्ये लॉन्च केले जाईल. हे विशेषतः तो देश असेल जिथे पिक्सेल फोन पहिल्यांदा लॉन्च झाला आहे. अशा परिस्थितीत गुगल स्मार्टवॉचसाठी भारतीयांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. गुगलच्या स्मार्टवॉचचे सांकेतिक नाव ‘रोहन’ दिले गेले आहे. Google चे आगामी स्मार्टवाॅच WearOS 3 सह लॉन्च केले जाईल. तर गुगल वॉचमध्ये एक राउंड डायल दिली जाण्याची शक्यता आहे.(WhatsApp ने एका महिन्यात 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे केले बंद अकाउंट्स, जाणून घ्या कारण)
मेटा स्मार्टवॉच फ्रंट कॅमेरासह देण्यात येईल. तसेच एक गोल स्क्रीन मिळेल आणि फ्रंट कॅमेरा देखील असेल. घड्याळाच्या उजव्या बाजूला एक बटण दिले जाण्याची शक्यता आहे. तर गुगल फिटबिट आणि गार्मिन वॉचमध्ये सध्याचे अनेक फिटनेस ट्रॅकिंग फिचर्स दिले जातील. वॉचमध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी कॅमेरा दिला जाईल. मेटा वॉचचे लॉन्चिंग 2022 च्या सुरुवातीला होऊ शकते.