गुगलचे नवं Go Search अ‍ॅप लॉन्च, प्ले स्टोरअरमधून करा डाऊनलोड

गुगलने Go Search नावाचे नव अ‍ॅप लॉन्च केले आहे. गो सर्च हे अ‍ॅप खरतर गुगल सर्चचे (Google Search) लाइट वर्जन आहे. तसेच 75 MB चा अ‍ॅप असून एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी अवघे काही सेकंदच लागणार आहेत.

गुगल (Photo Credit: Shutterstock)

गुगलने Go Search नावाचे नव अ‍ॅप लॉन्च केले आहे. गो सर्च हे अ‍ॅप खरतर गुगल सर्चचे (Google Search) लाइट वर्जन आहे. तसेच 75 MB चा अ‍ॅप असून एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी अवघे काही सेकंदच लागणार आहेत. ग्लोबली सर्व अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनच्या प्ले स्टोअरमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

गुगल गो अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड 5.0 लॉलीपॉप आणि त्यानंतरच्या सर्व वर्जनमधील स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप दिसणार आहे. तसेच गुगल लेन्ससारखाच या अ‍ॅपच्या मदतीने टेक्स्टला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये ठेऊन वाचू शकतो किंवा ट्रान्सलेट करता येणार आहे. त्याचसोबत मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून क्यू आर कोड स्कॅनकरुन सुद्धा एखाद्या गोष्टीची माहिती मिळवू शकता. अ‍ॅपच्या कॅमेऱ्यात दिसणारा टेक्स मेसेज तुम्ही बोलून ऐकून दाखवू शकता. याबाबत गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी माहिती पोस्ट केली होती. तसेच गुगल गो मधील अजून एक दमदार फिचर म्हणजे एखाद्या वेबसाईटवरील लिहिलेला संदेश स्पीकरच्या माध्यमातून ऐकवला जाणार आहे.(घरबसल्या तब्बल 7 कोटी रुपये कमावण्याची सूवर्णसंधी; Apple कंपनीची नवी ऑफर)

अ‍ॅन्ड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अन्य गुगल अ‍ॅपचे लाइट वर्जन युजर्सला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. यामध्ये Gallery Go, Gmail Go आणि YouTube Go यांचा समावेश आहे. परंतु गुगल गो अ‍ॅप हे कंपनीच्या अॅन्ड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिमचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement