Google Maps, Gmail, YouTube आजपासून 'या' स्मार्टफोन मध्ये बंद; इथे पहा यादी

दरम्यान ज्यांना Android 3.0 किंवा त्यावर अपग्रेड करता येत नाही त्यांनी डिव्हाईजच्या वेब ब्राऊज्जर वरून गूगल काऊंट वरून लॉग ईन करून पहावं. यामुळे काही सेवांचा फायदा घेता येणार आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

गूगल (Google) कडून गूगल मॅप्स (Google Maps), जीमेल (Gmail), युट्युब (YouTube) आणि काही इतर लोकप्रिय अ‍ॅप्सचा सपोर्ट काढून घेतला आहे. आज पासून आउटडेट झालेल्या Android च्या व्हर्जेनला त्याचा सपोर्ट नसेल. आता युजर्स या अ‍ॅप्समध्ये साईन ईन करू शकणार नाहीत. स्मार्टफोन जे Android 2.3.7 आणि त्यापेक्षा कमी व्हर्जेनचे आहेत त्यांच्यामध्ये Google's suite चालू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही मोबाईल ऑपरेटींग सिस्टिम डिसेंबर 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. नक्की वाचा: Google New Feature: आता फोटो आणि व्हिडिओ करता येणार Lock, गुगल घेऊन येणार भन्नाट फिचर.

कंपनी कडून जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंट मध्ये गूगलच्या सध्या युजर्सना सेफ ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये जर त्यांच्या स्मार्टफोन मध्ये Android 2.3.7किंवा त्यापेक्षा कमीचं व्हर्जन असेल तर आज (27 सप्टेंबर 2021) पासून त्यामध्ये साईन ईन चा पर्याय बंद केला जाणार आहे. तुम्ही Gmail, YouTube आणि Maps मध्ये तशा वापरण्याचा प्रयत्न केला तरीही त्यासाठी युजरनेम किंवा पासवर्ड एरर दाखवला जाईल असं नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये Gmail, YouTube, Google Play Store, Google Calendar आणि Maps सह गूगलच्या अन्य लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे.

गूगलने Android 3.0 किंवा त्यावर अपग़्रेड करण्याचं आवाहन केले आहे. जर ते अपग़्रेड होत नसेल तर सहाजिकच साईन इन एरर येईल असं सांगण्यात आलं आहे.

Sony Xperia Advance, Lenovo K800, Sony Xperia Go, Vodafone Smart II, Samsung Galaxy S2, Sony Xperia P, LG Spectrum, and Sony Xperia S हे स्मार्टफोन वापरणार्‍यांना या डेव्हलपमेंट मुळे तोटा आहे. LG Prada 3.0, HTC Velocity, HTC Evo 4G, Motorola Fire, आणि Motorola XT532 वापरणार्‍यांमध्येही अ‍ॅप्स सपोर्ट करू शकणार नाही.

दरम्यान ज्यांना Android 3.0 किंवा त्यावर अपग्रेड करता येत नाही त्यांनी डिव्हाईजच्या वेब ब्राऊज्जर वरून गूगल काऊंट वरून लॉग ईन करून पहावं. यामुळे काही सेवांचा फायदा घेता येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now