Forbes Digital Stars 2022: फोर्ब्सने जारी केली भारतामधील टॉप 100 डिजिटल क्रिएटर्सची यादी; Nikhil Sharma पहिल्या स्थानावर (See List)

यानंतर सौंदर्य आणि फॅशन जगताशी संबंधित लोकांना स्थान मिळाले आहे. या डिजिटल स्टार्सनी कॉमेडी, ट्रॅव्हल, फॅशन, ब्युटी, फूड, बिझनेस अशा क्षेत्रांत लोकप्रियता मिळवली आहे.

Forbes Digital Stars 2022 (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्याच्या सोशल मिडियाच्या युगात इंस्टाग्राम, यूट्युब, फेसबुक अशा प्लॅटफॉर्मचे महत्व प्रचंड वाढले आहे. म्हणूनच डिजिटल क्रिएटर्सना (Digital Creators) सुगीचे दिवस आले आहेत. जगभरात उत्तोमोत्तम डिजिटल क्रिएटर्स सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली कला, आपले गुण जगासमोर मांडून पैसे आणि लोकप्रियता मिळवत आहेत. यात भारतही मागे नाही. भारतातही अनेक क्रिएटर्सनी सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वतःचा वैयक्तिक ब्रँड तयार केला आहे. आता फोर्ब्सने भारतातील टॉप 100 डिजिटल स्टार्सची 2022 (Forbes Digital Stars 2022) ची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

कॉमेडी क्रिएटर्स या यादीत वरच्या स्थानावर असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. यानंतर सौंदर्य आणि फॅशन जगताशी संबंधित लोकांना स्थान मिळाले आहे. या डिजिटल स्टार्सनी कॉमेडी, ट्रॅव्हल, फॅशन, ब्युटी, फूड, बिझनेस अशा क्षेत्रांत लोकप्रियता मिळवली आहे.

फोर्ब्सच्या निवेदनानुसार, निखिल शर्माने ‘प्रवास’ श्रेणीत सर्वाधिक 9.06 इनस्कोअर मिळवून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कॉमेडियन अभिषेक उपमन्यूने 9.06 च्या स्कोअरसह दुसरा, कोमल पांडेने 9.03 च्या स्कोअरसह तिसरा क्रमांक पटकावला. मोहम्मद सलीम खान आणि अनमोल जैस्वाल यांनी प्रवासी श्रेणीत चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला. पुढे निर्मल पिल्लई सहाव्या, श्लोक श्रीवास्तव सातव्या, सौरभ घाडगे आठव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बीबॉम नवव्या आणि सुजित भक्तन दहाव्या स्थानावर आहे. (हेही वाचा: अॅमेझॉनच्या सर्वात मोठ्या वार्षिक सेलची घोषणा; स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, इलेक्ट्रोनिक्स प्रॉडक्ट्सवर बंपर सूट, जाणून घ्या तारखा)

तुम्ही या ठिकाणी ही 100 स्टार्सची लिस्ट पाहू शकता-

दरम्यान, या यादीत पुरुष आणि महिला यांनी समान प्रमाणात योगदान दिले आहे आणि या यादीत दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या बाबतीत नताशा नोएल अव्वल आहे, तर आशिष चंचलानीचे फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. यादीतील 100 क्रिएटर्सचा सरासरी एंगेजमेंट दर 5.89 टक्के आणि सरासरी INCA स्कोअर 8.39 आहे. रिपोर्टनुसार, भारतीय दररोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरासरी 2 तास 36 मिनिटे घालवतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif