Flipkart Xtra: सणासुदीच्या दिवसांआधी फ्लिपकार्ट देत आहे तब्बल 4000 लोकांना नोकऱ्या; लॉन्च झाले 'फ्लिपकार्ट एक्स्ट्रा'

कंपनीने बुधवारी सांगितले की, एखादी व्यक्ती, सर्व्हिस एजन्सी आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'फ्लिपकार्ट एक्सट्रा' (Flipkart Xtra) हे स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल सादर केले जात आहे

Flipkart (Photo Credits: File Photo)

वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, एखादी व्यक्ती, सर्व्हिस एजन्सी आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'फ्लिपकार्ट एक्सट्रा' (Flipkart Xtra) हे स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल सादर केले जात आहे. 'फ्लिपकार्ट एक्सट्रा' अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. मार्केटप्लेसमध्ये ‘डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह’ या पोस्टसाठी नोकरभरती करून याची सुरुवात होणार आहे.

पुढे सर्व्हिस एजन्सी आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल लोकांना सर्व्हिस पार्टनर आणि तंत्रज्ञ म्हणून सामील करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसांत नवरात्रीला सुरुवात होईल त्यानंतर लगेच दिवाळी येईल. तर अशा सणासुदीच्या आधी आणि ‘फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2021 सेल’च्या आधी ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ लॉन्च करण्यात आले आहे. लोकांची भरती करताना त्यांची पार्श्वभूमी पडताळणीनंतर व्यक्ती विविध रोल/पोस्टसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे.

याद्वारे पार्ट टाईम कामाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची सप्लाय चेन मजबूत करण्यास मदत करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे हजारो लोकांना अतिरिक्त काम व त्याद्वारे कमाईची संधी उपलब्ध होत आहे. डिसेंबर 2021 पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे 4,000 अर्धवेळ सहयोगी जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. (हेही वाचा: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत)

अॅपद्वारे यामध्ये सामील होण्यासाठी, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. फ्लिपकार्ट तुम्हाला तुमची माहिती शेअर करण्यासाठी आणि तुमची पार्श्वभूमी पडताळण्यासाठी आयडी प्रूफ अपलोड करण्यास सांगेल. यशस्वी पडताळणीनंतर, अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या निवडीच्या कार्यासाठी निवडले जाईल. फ्लिपकार्ट वर्षातील सर्वात मोठा बिग बिलियन डेज सेलची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून करणार आहे, जो 12 ऑक्टोबरपर्यंत चालेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif