Flipkart Launches UPI Services: फ्लिपकार्टने सुरू केली UPI सेवा; Google Pay आणि Paytm ला देणार टक्कर

तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲप नसेल तर तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करून Flipkart UPI वापरू शकता.

Flipkart UPI (PC - X/@yabhishekhd)

Flipkart Launches UPI Services: तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टचे ग्राहक असाल आणि ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टने आपल्या भारतीय ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने आता आपली UPI सेवा भारतात सुरू केली आहे. याचा अर्थ आता तुम्ही इतर UPI पद्धतींप्रमाणेच ऑनलाइन पेमेंटसाठी फ्लिपकार्टचा वापर करू शकाल. Flipkart UPI सेवा सुरू केल्यानंतर, Google Pay, Paytm, PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मला कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. आता तुम्हाला कुठेही ऑनलाइन पेमेंट करायचे असल्यास, तुम्ही QR कोड स्कॅन करून फ्लिपकार्टद्वारे सहजपणे पेमेंट करू शकाल. Flipkart UPI च्या माध्यमातून तुम्ही बिल, मोबाईल रिचार्ज करू शकता.

भारतातील पेटीएम पेमेंट बँक अनेक समस्यांना तोंड देत असताना फ्लिपकार्टची UPI सेवा सुरू झाली आहे. पेटीएमच्या त्रासात फ्लिपकार्टच्या UPI सेवेचा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे. UPI सेवा सुरू करण्यासाठी फ्लिपकार्टने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. फ्लिपकार्टने आपली UPI सेवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सुरू केली आहे. (हेही वाचा - UPI Service to Sri Lanka and Mauritius: आता मॉरिशस आणि श्रीलंकेतही UPI द्वारे पैसे करता येणार ट्रान्सफर)

'असा' करा Flipkart UPI सेवेचा वापर -

जर तुम्हाला Flipkart UPI सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला Flipkart ची नवीनतम आवृत्ती इंस्टॉल करावी लागेल. तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲप नसेल तर तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करून Flipkart UPI वापरू शकता. (हेही वाचा -'BharatPe'ला सरकारने पाठवली नोटीस, संस्थापकावर केलेल्या कारवाईची मागवली माहिती)

तपशील भरल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक सत्यापन कोड पाठवला जाईल, एकदा सत्यापित झाल्यानंतर, तुमचा Flipkart UPI सक्रिय होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif