Flipkart Big Diwali Sale आज पासून सुरु, मोबाईल फोन आणि टिव्हीच्या खरेदीवर मिळणार दमदार ऑफर

Flipkart | File Photo

Flipkart Big Diwali Sale 2020 आजपासून सुरु झाला आहे. हा दिवाळी सेल येत्या 13 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल मध्ये पॉप्युलर स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर दमदार सूट दिली जाणार आहे. फ्लिपकार्टकडून दुसऱ्या टप्प्यातील दिवाळी सेलसाठी Axis Bank, Citi Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank सह हातमिळवणी केली आहे. फ्लिपकार्टकडून सेल वेळी डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून प्रोडक्ट्स खरेदी केल्यास त्यावर 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.

या सेल दरम्यान, iPhone XR च्या 64GB वेरियंट 38,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. फोनच्या खरेदीवर 14,100 रुपयांच्या इंस्टंट डिस्काउंट ही दिला जाणार आहे. त्याचसोबत अन्य बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंटसह अन्य ऑफर्सचा सुद्धा लाभ घेता येणार आहे.(Amazon दिवाळी सेलमध्ये NETGEAR च्या Wi-Fi प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक)

Samsung Galaxy S20+ हा स्मार्टफोन 83,000 रुपयांऐवडी 54,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फोनच्या खरेदीवर 14,600 रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जाणार आहे. त्याचसोबत काही अन्य बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर सुद्धा 10 टक्के डिस्काउंटसह अन्य ऑफर्सचा ही मिळणार आहेत.

Flipkart Big Diwali सेल मध्ये Philips 50-inch 4K smart TV ग्राहकांना 33,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. स्मार्ट टिव्हीच्या एक्सचेंज बोनसवर 11 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. हा स्मार्ट टीव्ही Dolby Vision आणि Dolby Atmos सराउंड साउंड सपोर्ट करणार आहे. स्मार्ट टीव्ही तीन HDMI पोर्ट आणि दोन USB पोर्ट सपोर्ट करणार आहे.(सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी, व्यवहार करताना Bank Frauds चा धोका; या 6 बॅंकिंग आर्थिक फसवणूकीच्या मार्गांबाबत दक्ष रहा!)

तसेच Asus Vivo 14 लॅपटॉप हा 55,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 10th जनरेशन Intel Core i5 प्रोसेसरला सपोर्ट करणार आहे. लॅपटॉप 8जीबी रॅम सपोर्ट करणार आहे. लॅपटॉपमध्ये 256जीबी इनबिल्ड स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे. लॅपटॉप स्पेस मेमोरी कार्डच्या मदतीने 256जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.