WhatsApp प्रमाणेच आता Facebook Messenger वर पाठवलेला मेसेज Unsend करता येणार, पहा कसा आणि किती वेळात डीलिट करू शकाल मेसेज

आता फेसबुक मेसेंजरवरदेखील मेसेज डीलिट करण्याचा पर्याय ग्राहकांना खुला होणार आहे.

फेसबुक ((Photo Credit: Pixabay)

अधिकाधिक युजर्सना सतत आकर्षित करण्यासाठी फेसबुक(Facebook) नेहमीच अपडेट करत असतं. फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) हे फेसबुकद्वारा चॅटिंग करण्याचं एक माध्यम आहे आणि आता त्यामध्येच नवं फीचर युजर्सच्या भेटीला येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) प्रमाणेच आता फेसबुक मेसेंजरवरदेखील मेसेज डीलिट करण्याचा पर्याय ग्राहकांना खुला होणार आहे.

फेसबुक मेसेंजरवर डिलिट फॉर एव्हरीवन हा पर्याय खुला होणार आहे. त्यामुळे चुकून पाठवलेला किंवा नको असलेला मेसेज डीलिट करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. युजर्सना 10 मिनिटांच्या आतमध्ये मेसेज डिलिट करता येईल. यासाठी Unsend हे खास बटण असेल. अ‍ॅपलच्या आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या युजर्सना हे बटण देण्यात आलं आहे. लवकरच इतर सर्व मेसेंजरमध्ये या फीचरची उपलब्धता खुली केली जाणार आहे. WhatsApp ने आणले Face किंवा Touch ID ने लॉक-अनलॉकचे भन्नाट फिचर

फेसबुकच्या मालकीच्या इतर अ‍ॅप्लिकेशनमध्ये मेसेज अनसेंड करण्याची सुविधा आहे. मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः हे फीचर आजमावून पाहिले आहे. मागील वर्षी जून महिन्यापासून हे फीचर चर्चेमध्ये आहे. मेसेज अनसेंड करण्यापूर्वी युजरकडून त्याबाबतचं कंफर्मेशन घेतलं जातं. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर हे फीचर देण्यात आलं आहे.