Facebook Cloning Scam: सोशल मीडीयात Facebook वर अकाऊंट्स क्लोनिंग करुन आर्थिक फसवणूकीचा वाढतोय धोका; कशी कराल त्याची तक्रार?
तुमच्या आयुष्यात काय होतंय? हे सारेच सतत सोशल मीडियामध्ये अपडेट करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. पण तुमच्या या अवघ्या काही लाईक्स, कमेंट्स आणि शेअरच्या पावसामध्ये तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून ते अगदी आर्थिक फसवणूक होण्यापर्यंत अनेक गोष्टी घडू शकतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या एका क्लिकवर जगभरात कुठेही असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींसोबत संपर्क साधता येतो. आजकाल या सोशल मीडीयातच आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट्स टाकण्याचं व्यसन लागलं आहे. तुम्ही कुठे आहात, कुणासोबत आहात? तुमच्या आयुष्यात काय होतंय? हे सारेच सतत सोशल मीडियामध्ये अपडेट करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. पण तुमच्या या अवघ्या काही लाईक्स, कमेंट्स आणि शेअरच्या पावसामध्ये तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून ते अगदी आर्थिक फसवणूक होण्यापर्यंत अनेक गोष्टी घडू शकतात. दरम्यान सोशल मीडीया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. आजकाल सोशल मीडियातही तुम्हांला सजग राहणं गरजेचे झाले आहे अन्यथा तुमचं अकाऊंट हॅक करण्यापासून अगदी हुबेहुब दुसरं अकाऊंट बनवून देखील फसवणूकीचा धोका वाढत आहे.
सोशल मीडियामध्ये सध्या फेसबूक क्लोनिंग स्कॅम सर्रास आढळतो. यामध्ये जुन्या अकाऊंटला हातही न लावता अगदी हुबेहुब अकाऊंट बनवलं जातं. असाच प्रकार महाराष्ट्रातील संदीप पोटे या फेसबूक युजर सोबत देखील झाला आहे. 2 दिवसांपूर्वी त्याच्या अकाऊंटचे देखील फेसबूक क्लोनिंग झाले होते. त्याच्या काही मित्र/ मैत्रिणींनी ओळख न पटवता बनावट अकाऊंटच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकरल्या होत्या. त्यानंतर सुरूवातीला गूड मॉर्निंग, गूड नाईटचे मेसेज आले पण हळूहळू या बनावट अकाऊंट वरून 'मला आर्थिक मदतीची गरज आहे, काही दिवसांत पैसे परत देतो' असे मेसेज देखील येण्यास सुरूवात झाली. सुदैवाने या प्रकारामध्ये कोणतीही आर्थिक फसवणूक झाली नाही. संबंधित मित्रांनी संदीपला संपर्क साधून त्याबददल विचारलं आणि हे बनावट अकाऊंट असल्याचं समोर आले आहे. सध्या त्याचं बनावट अकाऊंट डिलीट झाले आहे तर मूळ अकाऊंट सुरक्षित आहे. ऑनलाईन मदत मागितल्यानंतर या व्यक्तीला पोलिसांत तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
असा प्रकार समोर आल्यानंतर तुम्हांला नेमकं काय करावं? हा प्रश्न पडला असेल. तुम्ही पोलिसांना याची माहिती दिल्यास ते तुम्हांला नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा सल्ला देतील. पण फेसबूकवरही अशा फेसबूक क्लोनिंग स्कॅँमला घेऊन तक्रार नोंदवण्याची सोय आहे.
फेसबूक वरच Facebook cloning Scam ची तक्रार कशी नोंदवाल?
- फेक अकाऊंट ओपन करा.
- उजव्या बाजूला 3 टिंब असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Find Support or Report Profile चा पर्याय निवडा.
- पुढे Pretending to be someone वर क्लिक करा.
तुम्ही फेसबूकला तर खोट्या फेसबूक अकाऊंटची माहिती दिली पाण तुमच्या अकाऊंटवरून किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून देखील खोट्या अकाऊंटच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकरण्याचं आवाहन करा. आर्थिक व्यवहारासाठी कोणतीही खाजगी माहिती फेसबूक पोस्ट, मेसेंजर द्वारा अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. तसेच तुमचं अकाऊंट क्लोन होऊच नये यासाठी प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल करा. त्यामध्ये तुम्ही शेअर करत असलेली माहिती पब्लिक ऐवजी केवळ स्वतःसाठी आणि मित्रपरिवारासोबतच शेअर करता येईल अशी ठेवा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)