भारतात प्रथमच लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँक लॉन्च, जाणून घ्या खासियत

EVM ENLAPPOWER (Photo Credits-Twitter)

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांसाठी स्मार्टफोन आणि लॅपटॉप हा एक महत्वाचा भाग बनला आहे. कारण दिवसभर लॅपटॉपवर काम करताना अचानक लाईट गेल्यास आणि लॅपटॉपला चार्जिंग नसले तर पंचाईत होते. अशातच EVM कंपनीने युजर्सच्या सुविधेसाठी भारतातील पहिली लॅपटॉप पॉवर बँक लॉन्च करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कधीही लॅपटॉपला चार्जिंग करु शकता. खासकरुन ट्रॅव्हल करताना लॅपटॉप चार्जिंग करण्यास मदत होणार आहे.(Nokia ने लॉन्च केला 75 इंचाचा 4K UHD स्क्रिन टीव्ही, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

EVM ENLAPPOWER लॅपटॉप पॉवर बँक भारतात 9,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. यासाठी 20000mAh ची बॅटरी दिली असून युएसबी पोर्टसह येणार आहे. म्हणजेच युजर्सला मॉर्डन युएसबी सी पोर्ट असणाऱ्या लॅपटॉपसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र भारतात युएसबी पोर्ट असणाऱ्या लॅपटॉपची संख्या कमीच आहे. ही EVM ENLAPPOWER लॅपटॉप पॉवर बँक एक्सक्सुसिवली विजय सेल्स मध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.(Google Pay च्या वेब अॅपवर जानेवारी 2021 पासून पेमेंट बंद; त्वरीत पैसे पाठवण्यासाठी आकारले जाऊ शकते शुल्क)

EVM ENLAPPOWER च्या मदतीने युजर्सला जे लॅपटॉप चार्जिंग करता येणार आहेत त्यामध्ये Macbook, Macbook Air, Macbook Pro, MS Surface Pro, Dell XPS 13, HP Spectre x360, Lenovo IdeaPad, LG Gram आणि Asus Zenbook 13 यांचा समावेश आहे. ही पॉवर बँक 2 वर्षांच्या वॉरंटीसह येणार आहे, हे डिवाइस अल्ट्रा प्रीमियम मेटल बॉडी आणि क्लासी लूकसह येणार आहे. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यासोबत 5 फुट लांब टाइप सी आणि सिंक केबल दिली जाणार आहे. खासियत म्हणजे EVM ENLAPPOWER पॉवर बँक एअर ट्रॅव्हलच्या वेळी अगदी सुरक्षित आहे.