Elon Musk वर भरवण्यात येणार खटला; ट्विटद्वारे Tesla च्या शेअर्समध्ये घोटाळा केल्याचा आरोप
या प्रकरणी शेअरधारकांनी मस्क यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या ट्विटमुळे त्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Tesla CEO Elon Musk) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मस्क यांना स्टॉक मार्केटमध्ये फेरफार केल्याप्रकरणी खटल्याचा सामना करावा लागणार आहे. खटला कॅलिफोर्नियाबाहेर हलवण्याचे त्यांचे आवाहन न्यायालयाने फेटाळले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये त्यांनी ट्विट केले होते की, त्यांच्याकडे टेस्लाला खाजगी कंपनी बनवण्यासाठी पुरेसे पैसे आहेत, ज्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसली होती. या प्रकरणी शेअरधारकांनी मस्क यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या ट्विटमुळे त्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
न्यायालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, न्यायाधीश एडवर्ड चेन यांनी शुक्रवारी कार्यवाही दक्षिणेकडील यूएस राज्य टेक्सासमध्ये हस्तांतरित करण्यास नकार दिला, जेथे मस्कने टेस्लाचे मुख्यालय हलवले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी सुरू होऊ शकते, असे न्यायालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. (हेही वाचा - Twitter Layoffs: पुन्हा एकदा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नारळ, ट्विटरमधील ‘या’ विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरकपात)
ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनीने त्याच्या एकूण 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले असून साइटची सामग्री नियंत्रण धोरणे बदलली आहेत. 2018 मध्ये, मस्कच्या एका ट्विटने अमेरिकन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावर कारवाई करत, यूएस स्टॉक मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने मस्क यांना टेस्लाच्या बोर्डाचे अध्यक्षपद सोडण्याचे आणि $ 20 दशलक्ष दंड भरण्याचे आदेश दिले.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, एलोन मस्क सध्या सुमारे $132 अब्ज संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐलॉन मस्क यांच्यावर टीका होत आहे. कंपनीचा खर्च वाचवण्यासाठी मस्क यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून याचा कर्मचाऱ्यांवर परिणाम होत आहे.