Elon Musk World's Richest Person: एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती आहे संपत्ती? घ्या जाणून
SpaceX आणि Tesla Inc च्या मागे दूरदर्शीपणे उभ्या असलेल्या एलन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल (World's Wealthiest Individuals) स्थानावर आले आहेत. ट्विटर खरेदी केल्यांतर मस्क यांचे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत असलेले अव्वल स्थान घसरले होते. जे त्यांनी पुन्हा मिळवले आहे.
SpaceX आणि Tesla Inc च्या मागे दूरदर्शीपणे उभ्या असलेल्या एलन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल (World's Wealthiest Individuals) स्थानावर आले आहेत. ट्विटर खरेदी केल्यांतर मस्क यांचे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत असलेले अव्वल स्थान घसरले होते. जे त्यांनी पुन्हा मिळवले आहे. एलन मस्क यांची संपत्ती आता सुमारे $192.3 अब्ज इतकी आहे. ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मस्क यांची संपत्ती लक्झरी टायकून बर्नार्ड अर्नॉल्टच्या (Bernard Arnault) तुलनेत वाढली आहे. त्यामुळे ते 1 जून 2023 पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
ब्लूमबर्ग निर्देशांक न्यू यॉर्कमधील प्रत्येक ट्रेडिंग दिवसाच्या शेवटी अद्ययावत केला जातो. ज्यामध्ये जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीची आकडेवारी असते. तसेच हा निर्देशांक जगातील सर्वात श्रीमंत लोकांची दैनिक क्रमवारी प्रदान करतो. ब्लुमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या शिखरावर आहेत. (हेही वाचा, Twitter New CEO: ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून Linda Yaccarino यांची निवड; Elon Musk यांनी ट्विटद्वारे दिली माहिती)
दरम्यान, एलन मस्क यांच्या नंतर जगभरातील श्रीमंताच्या यादीमध्ये पहिल्या दहा क्रमांकात , बिल गेट्स, लॅरी एलिसन, स्टीव्ह बाल्मर, वॉरेन बफे, लॅरी पेज, सर्जी ब्रिन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
का वाढली मस्क यांची संपत्ती?
पाठिमागील काही काळापासून टेस्ला कंपनीचे शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणावर वधारले आहेत. हे भाव 66% वाढले आहेत. परिणामी मस्क यांची संपत्ती चांगलीच वधारली आहे. याउलट, पॅरिस ट्रेडिंगमध्ये अर्नॉल्टच्या LVMH चे शेअर्स 2.6% घसरले, ज्याने मस्कला अरनॉल्टला मागे टाकण्यास हातभार लावला.
टेस्लासह इलेक्ट्रिक वाहनांमधील त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे आणि SpaceX सह खाजगी अंतराळ प्रवासामुळे मस्कचा संपत्तीच्या शिखरावर जाण्याचा प्रवास मोकळा झाला आहे. शाश्वत ऊर्जा भविष्य आणि आंतरग्रहीय मानवी सभ्यतेची त्यांची दृष्टी, त्यांच्या अथक मोहिमेसह आणि नावीन्यपूर्णता अशा अनेक गोष्टांनी मस्क यांच्या आर्थिक यशाला आधार दिला असे अभ्यासक सांगतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)