खुशखबर! Jio कडून दिवाळीची बंपर ऑफर; आता जिओफोन विकत घ्या अवघ्या 699 मध्ये, जाणून घ्या इतर माहिती

दिवाळीनिमित्त ई कॉमर्स कंपन्यांच्या मोठ्या ऑफरच्या सेलचा धमाका चालू आहे. अशात जिओनेदेखील (Reliance Jio) आपल्या फोनवर (JioPhone) भन्नाट ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओचा सर्वांना परवडणारा स्मार्ट फीचर फोन, जिओ फोन या सणाच्या हंगामात 699 रुपयांना

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Official Website)

सध्या दिवाळीनिमित्त ई कॉमर्स कंपन्यांच्या मोठ्या ऑफरच्या सेलचा धमाका चालू आहे. अशात जिओनेदेखील (Reliance Jio) आपल्या फोनवर (JioPhone) भन्नाट ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओचा सर्वांना परवडणारा स्मार्ट फीचर फोन, जिओ फोन या सणाच्या हंगामात 699 रुपयांना विकत घेता येऊ शकेल. जिओने मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली. जिओफोन जुलै 2017 मध्ये 1,500 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. मागील महिन्यात या फोनसह एक्सचेंज ऑफर जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर हँडसेटची प्रभावी किंमत 501 रुपये झाली होती. मात्र आता टेलिकॉम कंपनीने जाहीर केले आहे की जिओ फोन अवघ्या 699 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

फोनची ही किंमत 'जिओ फोन दिवाळी 2019' (Jio Phone Diwali 2019) ऑफरचा एक भाग आहे. रिलायन्स जिओकडून जिओ फोन रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 700 रुपयांचा फायदा होईल. अतिरिक्त डेटासाठी ग्राहकांना प्रथम सात रिचार्ज करावे लागतील, यानंतर कंपनी खात्यात 99 रुपयांचा डेटा जोडेल. जिओफोनची ही ऑफर 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान, एक सिम असलेल्या या फोनमध्ये 2.4 इंच क्विडब्ल्यूवीजीए (240x320 पिक्सल) डिस्प्ले आहे. 1.2 गीगाहर्ट्झ स्प्रेडट्रम एसपीआरडी 98 20A/QC9805 ड्युअल कोर प्रोसेसर आहे. माली -400 जीपीयू इंटिग्रेटेड आहे, सोबत 512 एमबी रॅम व इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे. यामध्ये आपण 128 जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड वापरू शकता. (हेही वाचा: MediaTek Chipset असलेला जिओचा नवा फोन लवकरच होणार लॉन्च)

हा फोनच्या मागील बाजूस एक 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे आणि समोरच्या पॅनेलवर एक व्हीजीए कॅमेरा आहे. जिओ फोनची बॅटरी 2000 एमएएच आहे. यामध्ये 12 तासांपर्यंतचा टॉकटाइम आणि 15 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय वेळ असल्याचा दावा केला जात आहे. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांमध्ये 4 जी व्हीएलटीई, ब्लूटूथ व्ही 4.1, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडिओ, जीपीएस आणि यूएसबी 2.0 सपोर्ट समाविष्ट आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now