AmazonBasics 4K टीव्ही लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह अधिक माहिती

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट Amazon यांनी पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट टीव्हीतील नवी रेंज उतरवली आहे. AmazonBasics Fire TV edition hd tv भारतात दोन मॉडेल्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट Amazon यांनी पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट टीव्हीतील नवी रेंज उतरवली आहे. AmazonBasics Fire TV edition hd tv भारतात दोन मॉडेल्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 इंचाचा टीव्हीची किंमत 29,999 रुपये आणि तर 55 इंचाचा टीव्हीची किंमत 34,999 रुपये ठेवली गेली आहे. दोन्ही टीव्ही अॅमेझॉनच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन दिले असून तुम्हाला ते AB50U20PS आणि AB55U20PS नावाने पाहता येणार आहेत. या टीव्हीसाठी कंपनीने दमदार फिचर्स ही दिले आहेत. जे 4K HDR LED डिस्प्ले पॅनल. Dolby Vision, Dolby Atmos सह अन्य काही फिचर्स ही ग्राहकांना मिळणार आहेत.

AmazonBasics Fire TV Edition Ultra-HD TV हा टीव्ही Xiaomi, Hisense, Vu आणि TCL सह अन्य कंपन्यांच्या एन्ट्री लेव्हल 4K Smart TV सेगमेंट प्रोडक्ट्ससोबत टक्कर देणार आहे. खरंतर अॅमेझॉनने एन्ट्री लेव्हल 4K टीव्ही सेगमेंट टारगेट केला आहे. ज्यामध्ये कमी किंमतीत उत्तम स्मार्ट टीव्ही आणि त्याची डिमांड अधिक आहे.(Amazon Mega Salary Days सेल ला उद्यापासून सुरुवात; टीव्ही, फ्रिज, हेडफोन्स, होम अप्लायन्सेस सह या प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक सूट)

भारतात प्रथमच अॅमेझॉनच्या या दोन्ही स्मार्ट टीव्हीसाठी एचडी एलईडी डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे स्क्रिन रेज्यॉल्यूशन 3840X2160 पिक्सल आहे. त्याचसोहत टीव्ही एचडीआर आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट करणार आहे. अॅमेझॉनच्या या दोन्ही टीव्हीमध्ये 20W स्पीकर्स ही दिले आहेत. तसेच डिस्प्ले रिफ्रेश रेट 60 हार्ट्ज पर्यंत असून कंपनीने दावा केला आहे की ते 178 डिग्री अँगल पर्यंत पाहता येणार आहे.

अॅमेझॉनच्या या टीव्हीमध्ये HDMI पोर्ट आणि दोन USB पोर्ट्स दिले आहेत. हे दोन्ही टीव्ही Alexa वॉइस असिस्टेंट सपोर्ट ही दिला गेला आहे. तसेच नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि युट्यूब सह अन्य अॅप डाऊनलोड करुन मनोरंजनाचा लाभ घेता येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement