Amazon Mega Salary Days सेल ला उद्यापासून सुरुवात; टीव्ही, फ्रिज, हेडफोन्स, होम अप्लायन्सेस सह या प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक सूट
Amazon | (File Photo)

अॅमेझॉन इंडिया ने मेगा सॅलरी डेज सेल (Mega Salary Days Sale) ची घोषणा केली आहे. 1 ते 3 जानेवारी दरम्यान हा सेल सुरु राहणार असून याअंतर्गत फ्रिज, मायक्रोव्हेव, वॉशिंग मशिन, टीव्ही, फर्निचर, स्पोर्ट्स प्रॉडक्ट, होम अप्लायन्सेस, टॉईज आणि इत्यादी वस्तूंवर आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. सॅमसंग (Samsung), लजी (LG), वर्लपूल (Whirlpool), गोदरेज (Godrej), सोनी (Sony), जेबीएल (JBL) आणि इत्यादी ब्रँडच्या प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट या सेल अंतर्गत मिळत आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्ड वापरुन खरेदी करणाऱ्यांना वस्तूंवर 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.

हेडफोन्स, स्पीकर्स, लॅपटॉप:

या सेल मध्ये अपलायन्सेसवर 200 वेगवेगळ्या डिल्स सादर करण्यात येणार आहेत. हा सेल शुक्रवार, 1 जानेवारी ते रविवार, 3 जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. या सेल अंतर्गत सोनी, जेबीएल आणि बोट या कंपनींचेच हेडफोन्स 50 टक्के डिस्काऊंटवर उपलब्ध असतील. त्यासोबतच बोट, जेबीएल आणि शाओमीचे साऊंड बार्स 30 टक्के डिस्काऊंटवर खरेदी करु शकाल. लॅपटॉप आणि डेस्कटॉप्सवर 30,000 पर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो. त्यासोबत स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकरवर सुद्धा 40 टक्के डिस्काऊंट मिळेल.

टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन:

अॅमेझॉन सॅलरी डेज सेल अंतर्गत वॉशिंग मशिन आणि एअर कंनडिशनर्स वर 35 टक्के डिस्काऊंट, मायक्रोव्हेव आणि चिमणीवर 40 टक्के डिस्काऊंट तर केवळ 6490 रुपयांपासून फ्रिज उपलब्ध होणार आहेत. 32 इंच स्मार्ट टीव्ही वर 25 टक्के डिस्काऊंट तर अनरॉईड टीव्हीवर 30 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.

Home Appliances:

युरेका होर्ब्स, प्रेसटीज आणि बोरोसील या कंपन्यांच्या किचन अपलायन्सेसवर वेगवेगळ्या ऑफर्स मिळणार आहेत. डिसइंफेक्टन्ट आणि क्लिनिंग प्रॉडक्ट्सवर 30 टक्के डिस्काऊंट तर सेफ्टी प्रॉडक्ट्सवर 50 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.

फर्निचर:

होमडाऊन, स्लीपवेयर आणि अॅमेझॉन ब्रँडच्या फर्निचरवर 50 टक्के सूट मिळणार असून ईएमआय ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. वर्क फ्रॉम होम फर्निचर आणि बेडरुम फर्निचर वर 50 टक्के डिस्काऊंट मिळत आहे.

Fitness Equipment:

Fitness Equipment वर 50 टक्कांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. सायकल्सवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट तर योगा मॅट्स आणि इतर अॅक्सेसरीजवर 50 टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार आहे. बॅटमिंटन, डमबेल्स आणि gym equipment वर देखील 40 ते 60 टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट मिळेल.

या सेलमुळे खास ऑफर्स सह खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यापैकी कोणती वस्तू खरेदी करायची असल्यास तुम्ही या सेलचा लाभ नक्कीच घेऊ शकता.