Amazon चे Kissan Store लॉन्च, घरबसल्या मागवता येणार शेती संबंधित वस्तू
हे स्टोर Amazon.in वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. किसान स्टोर वर शेती संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
केंद्रीय कृषि आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज Amazon किसान स्टोर (Kissan Store) लॉन्च केले आहे. हे स्टोर Amazon.in वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. किसान स्टोर वर शेती संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना या गोष्टी अगदी घरबसल्या ऑर्डर केल्यानंतर मिळणार आहेत. स्टोरवर 8 हजारांहून अधिक सेलर्सचे प्रोडक्ट्स नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये शेतीची बियाणे ते अवजारापर्यंतच्या गोष्टी ऑर्डर करता येणार आहेत.
नरेंद्र सिंह तोमर यांनी लॉन्चिंग इवेंटवेळी संबोधित करताना असे म्हटले की, किसान स्टोर लॉन्च करताना आनंद होत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आणि शेती संबंधित लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या वस्तू ऑर्डर करु शकतात. मंत्र्यांनी अॅमेझॉनच्या या पावलाचे स्वागत केले आहे. किसान स्टोर हे अगदी ऑनलाईन शॉपिंग प्रमाणे काम करणार आहे.(Amazon चे नवे सीईओ Andy Jassy यांची मोठी घोषणा- येत्या काही महिन्यात 55,000 लोकांना देणार नोकऱ्या, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात आहे संधी)
Tweet:
अॅमेझॉनने दावा केला आहे की, किसान स्टोर वर अन्य ठिकाणांपेक्षा स्वस्त किंमतीत बियाणांसह अन्य सामान उपलब्ध असणार आहे. या वस्तू ऑर्डर केल्यानंतर नागरिकांना त्याची होम डिलिव्हरी सुद्धा केली जाणार आहे. त्याचसोबत पेमेंटसाठी नेट बँकिंग, पेटीएम, अॅमेझॉन पे सह डेबिट, क्रेडिट कार्डची सुविधा ही मिळणार आहे. या किसान स्टोरला पाच भारतीय भाषांचा सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेचा समावेश असणार आहे.