Amazon Layoffs: Meta, Twitter आणि Microsoft नंतर आता अॅमेझॉननेही केली कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर जेमी झांग यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये दावा केला आहे की, त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.

Amazon (PC - Pixabay)

Amazon Layoffs: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या घोषणेनंतर आता अॅमेझॉननेही (Amazon) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर जेमी झांग यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये दावा केला आहे की, त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.

याशिवाय, अॅमेझॉनच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, संपूर्ण रोबोटिक्स टीमला पिंक स्लिप देण्यात आली होती. लिंक्डइन डेटानुसार कंपनीच्या रोबोटिक्स विभागामध्ये किमान 3766 लोक काम करतात. माजी कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवला तर कंपनीने 3500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. (हेही वाचा - Elon Musk On Twitter Employees: आठवड्यात 80 तास काम, खाण्यापिण्याच्या सुविधा बंद; ट्विटर कर्मचार्‍यांसाठी एलोन मस्कचे नवे फर्मान जारी)

कंपनीने गेल्या आठवड्यातच हायरिंग फ्रीज जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात, अॅमेझॉनने एका अंतर्गत मेलमध्ये सांगितले की, कंपनी मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणामुळे हायरिंग फ्रीज सुरू करेल. कंपनीतील पीपल एक्सपिरियन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेटी यांच्या मते, हायरिंग फ्रीज काही महिन्यांसाठी राहील. ते म्हणाले, "आम्ही पुढील काही महिने ही स्थिरता कायम ठेवण्याची अपेक्षा करतो." तथापि, हायरिंग फ्रीज असूनही, कंपनी काही प्रकल्पांसाठी नवीन कर्मचारी नियुक्त करेल. तसेच स्वेच्छेने कंपनी सोडलेल्या कर्मचार्‍यांची बदली करेल.

दरम्यान, Meta ने आपल्या जागतिक कर्मचार्‍यांमध्ये 13 टक्के किंवा 11,000 लोक कमी करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टनेही मोठ्या प्रमाणात टाळेबंदी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement