IND vs SL मॅचमध्ये रोहित शर्मा याला रन-मशीन बनण्याची संधी; सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा च्या विश्वचषक रेकॉर्डवर 'हिटमॅन' ची नजर

श्रीलंकाविरुद्ध पुन्हा एकदा रोहितला एकसाथ तीन रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

(Photo Credits: Getty Images)

टीम इंडिया चा सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंड (England) मधील विश्वचषकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतकं ठोकली आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सुद्धा फॉर्ममध्ये आहे. मात्र शतकापासून दूर राहिला आहे. वर्ल्ड कपमध्ये सलग अर्धशतके करण्याचा विक्रम त्यानं केला आहे. विश्वचषकमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या शेवटच्या सहा शतकात रोहितच आघाडीवर आहे. विश्वकप फायनल वगळता, भारताचे विश्वकपमध्ये 2 सामने शिल्लक आहे. त्यातील त्यांचा अंतिम ग्रुप स्टेज सामना 6 जुलैला श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध खेळाला जाणार आहे. आतापर्यंतच्या सामन्यात रोहितने 90.66 च्या सरासरीने 544 धावा केल्या आहेत. (IND vs SL सामन्याआधी लसिथ मलिंगा म्हणतो की यॉर्कर नव्हे तर ही गोष्ट बनवते जसप्रित बुमराह याला सर्वात धोकादायक गोलंदाज)

भारत (India) विरुद्ध श्रीलंका सामना इंग्लंडच्या हेडिंग्ले (Headingley) मध्ये होणार आहे. रोहितने आपल्या आतापर्यंतच्या खेळीने जणू कित्येक रेकॉर्ड मोडले आहे तर दुसरे बनवले आहेत. श्रीलंकाविरुद्ध पुन्हा एकदा रोहितला एकसाथ तीन रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. श्रीलंकाविरुद्ध विश्वकपमध्ये अजून एक शतक आणि रोहित विश्वचषक रेकॉर्ड करत लंकेचा माजी दिग्गज फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याला मागे टाकत एका विश्वकपमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. संगकारा आणि रोहित यांनी एक विश्वकपमध्ये चार शतके आहेत. संगकारा ने 2015 च्या विश्वकपमध्ये ही कामगिरी केली होती.

दुसरीकडे, रोहितला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा एक नाही तर दोन रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. एका विश्वकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माच्या नावावर आता 544 धावा जमा झाल्या आहेत. सचिन हा रेकॉर्ड यंदाच्या विश्वकपमध्ये मोडला जाणार आहे. सचिनचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी रोहितला 129 धावांची करण्याची गरज आहे. तिसरा आणि अंतिम रेकॉर्ड म्हणजे, विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड. 2003 च्या विश्वकपमध्ये सचिनने साखळी सामन्यात सर्वाधिक 586 धावा केल्या होत्या. श्रीलंकाविरुद्ध 42 धावा करत रोहित हा रेकॉर्ड मोडीत काढेल. दरम्यान, रोहितचा श्रीलंकाविरुद्ध वनडेतील रेकॉर्ड चांगला आहे. रोहितने श्रीलंकाविरुद्ध दोनदा 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.