IPL Auction 2025 Live

Coronavirus Outbreak: महिला टी-20 वर्ल्ड कप फायनल सामना पाहायला आलेल्या व्यक्तीला झाली 'कोरोना व्हायरस'ची लागण, MCG ने दिली माहिती

एमसीजीने मात्र या व्यक्तीला इतर लोकांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचे ठामपणे सांगितले.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (Photo Credits: Twitter|@ICC)

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडने (Melbourne Cricket Ground) गुरुवारी सांगितले की, भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये 8 मार्च रोजी आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपचा (Women's T20 World Cup) अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्याचे आढळले आहे. एमसीजीने मात्र या व्यक्तीला इतर लोकांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचे ठामपणे सांगितले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना 85 धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा महिलाटी-20 विश्वचषक जिंकला. “आरोग्य आणि मानव सेवा विभागाने (DHHS) संरक्षक निदानाचा सल्ला दिला आहे आणि सार्वजनिक व कर्मचार्‍यांच्या आसपासच्या सदस्यांपर्यंत कोविड-19 पसरविण्याचे कमी जोखीम म्हणून वर्गीकृत केले आहे. व्यक्तीएमसीजी येथे नॉर्दर्न स्टँडच्या एन 42 मधील लेव्हल 2 वर बसला होता," मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी), मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचे (एमसीजी) मैदानी व्यवस्थापक म्हणून एका निवेदनात म्हटले आहे. (कोरोना व्हायरसमुळे IPL 2020 अडचणीत; भारताने व्हिसा धोरण बदलल्याने परदेशी खेळाडूंच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह; निर्णय घेण्यासाठी 14 मार्च रोजी BCCI ची महत्वाची बैठक)

महिला टी-20 विश्वचषकचा अंतिम सामना पाहण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तब्बल 86174 प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यातील एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाली. अधिकाऱ्यांनी निवेदन देताना असे म्हटले आहे की, "जे एन 42 स्टँडमध्ये बसले होते त्यांनी त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. सोबतच जर त्यांना फ्लूची कोणतीही लक्षणे दिसली तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना सांगावे. ऑस्ट्रेलियन सरकारने कोरोना विषाणूचे रुग्ण आढळलेल्या 27 ठिकाणी जाण्यास लोकांना प्रतिबंधित केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना  यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला संघांदरम्यान खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम अत्यंत निराशाजनक गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये चार गडी गमावून 184 ची भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सुरुवातीपासूनच अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि टीम 19.1 ओव्हरमध्ये 99 धावांवर ऑलआऊट झाली.