Bulls-Eye! युजवेंद्र चहल याने श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा याला रनआऊट करण्यासाठी टाकलेला अचूक थ्रो पाहून गोलंदाजालाही झाले हसू अनावर, पाहा Video

चहलने केलेला रनआऊट पाहून कर्णधार कोहली यालाही विश्वास बसत नव्हता आणि अविश्वासात चहल जमिनीवर पडून हसत राहिला. 

146091युजवेंद्र चहल रनआऊट (Photo Credit: Twitter/Instagram)

शुक्रवारी पुण्यातील एमसीए (MCA) स्टेडियमवर श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मध्ये श्रीलंकेचा फलंदाज वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याला धावबाद करुन युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) खुद्द आश्चर्यचकित झाला. शार्दुल ठाकूरच्या श्रीलंकेच्या धावांचा पाठलाग 14 व्या ओव्हरदरम्यान ही घटना घडली. नंतरच्या अस्तित्त्वात नसलेल्या धावांची मागणी केल्यानंतर चहलने हसरंगाला धावबाद करण्याची सुलभ संधी वाया जाऊ दिली नाही. भारताने श्रीलंकेला दुसऱ्या टी-20 सामन्यात 78 धावांनी पराभूत केले. 202 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी 123 धावांवर ऑल आऊट केले. या विजयासह भारताने भारताने वर्षातील पहिली मालिका 2-0 ने जिंकली. गुवाहाटीमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर इंदोर सामन्यात भारताने 7 विकेटने विजय नोंदवला होता.(IND vs SL 2020: श्रीलंकाविरुद्ध पुणे टी-20 सामन्यात टीम इंडियाने बनवले 'हे' 10 प्रमुख रेकॉर्डस्; जसप्रीत बुमराह याने मिळवले अव्वल स्थान)

14 व्या ओव्हरमध्ये शार्दूल ठाकूर याच्या चेंडूवर हसरंगाने मिड-ऑफवर चहलच्या दिशेने चेंडू मारला. हंसरंगाला मिड-ऑफवर फिल्डरच्या उपस्थिती असल्याचे समजले नाही आणि निष्काळजीपणाने धाव घेतली. फलंदाज क्रीजच्या जवळ नसल्याचे पाहून चहलने बॉल पकडला आणि बुल्सआई मारला. यावर कर्णधार विराट कोहली यालाही विश्वास बसत नव्हता आणि अविश्वासात चहल जमिनीवर पडून हसत राहिला. हा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. इथे पाहा:

चहलने केलेला रनआऊट

 

View this post on Instagram

 

@yuzi_chahal23 😂😂 #yuzvendrachahal #chahal #virat #kohli #teamkohli #teamindia #indvssl #yuzichahal #washingtonsundar #jaspritbumrah #sanjusamson #manishpandey #cricketfans #cricketworld #cricketindia #cricketfacts #cricketnews #cricket #sports #sportupdates

A post shared by Cricket Addictor (@cricaddictor) on

a

202 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने नियमित अंतराने विकेट गमावली. धनंजया डी सिल्वा याने 158.33 च्या स्ट्राईक रेटने 36 चेंडूत 57 धावांचा डाव खेळला. तथापि, त्याच्या श्रीलंकेला विजय मिळवून देण्यासाठी एकट्याचे प्रयत्न पुरेसे नव्हते. श्रीलंकेला 4.1 ओव्हर बाकी असताना 123 धावांपर्यंत मजल मारली आणि भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात 78 धावांनी श्रीलंकेचा पराभव करत सहज विजय नोंदविला. एंजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने 31 धावा केल्या. धनंजय डी सिल्वा आणि मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी अवघ्या 29 चेंडूत अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये 68 धावांची भागीदारी होती. भारताने दिलेल्या लक्ष्याच्या पाठलाग करत श्रीलंका संघाने 4 ओव्हरमध्ये तीन गडी गमावले. पहिल्या षटकात बुमराहने दानुष्का गुणातीलाकाला बाद केले.