IPL 2022 SRH vs RR: आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार चुरशीची लढत, जाणून घ्या कोणत्या संघाचे पारडे आहे जड ?
आयपीएलच्या या मोसमात, हे दोन्ही संघ आपला पहिला सामना खेळणार आहेत. त्यांना स्पर्धेतील विजयाने सुरुवात करायची आहे.
IPL 2022 मध्ये मंगळवारी संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात, हे दोन्ही संघ आपला पहिला सामना खेळणार आहेत. त्यांना स्पर्धेतील विजयाने सुरुवात करायची आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Ken Williamson) आहे, तर राजस्थानची कमान संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक होती आणि यावेळी त्यांना नव्याने सुरुवात करायची आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावामध्ये हैदराबाद आणि राजस्थानच्या संघांनी अनेक युवा खेळाडूंवर मोठा सट्टा लावला.
याशिवाय संघात काही अनुभवी खेळाडूही आहेत, जे संघाला मजबूत करतात. दोन्ही संघांच्या मागील रेकॉर्डबद्दल सांगत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 15 सामने खेळले गेले आहेत. यापैकी सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात यश मिळवले आहे. गेल्या मोसमात दोघांमध्ये 2 सामने झाले, ज्यात हैदराबादने एक आणि राजस्थानने एक सामना जिंकला. हेही वाचा IPL 2022 Points Table Updated: पहिल्या तीन सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स नंबर 1 तर मुंबई इंडियन्स तळाशी, पहा पॉईंट टेबलची स्थिती
सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर सनरायझर्सची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 201 धावा आहे. तर राजस्थानने सनरायझर्सविरुद्ध सर्वाधिक 220 धावा केल्या होत्या. आतापर्यंतच्या आकडेवारीत आघाडीवर असलेला हैदराबाद यंदाच्या मोसमात राजस्थानविरुद्ध कशी कामगिरी करेल, हे पाहायचे आहे. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत 4 सामने झाले असून चारही सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना यश मिळाले आहे.
नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवला. यावरून हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात नाणेफेकही मोठी भूमिका बजावू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. असाच ट्रेंड गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला होता, ज्याची बरीच चर्चा झाली होती.