Ranji Trophy: शुभमन गिल यानी बाद झाल्यानंतर वापरले अपशब्द; पंचांनी बदलला निर्णय

पंजाब आणि दिल्ली संघ (Panjab Vs Delhi) यांच्यात रणजी करंडक सामना शुक्रवारी पंजाबच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर (I.S Bindra Stadium) सुरू झाला.

Shubhman Gill (Photo Credit: Getty Image)

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) एका वादात सापडला आहे. पंजाब आणि दिल्ली संघ (Panjab Vs Delhi) यांच्यात रणजी करंडक सामना शुक्रवारी पंजाबच्या आयएस बिन्द्रा स्टेडियमवर (I.S Bindra Stadium) सुरू झाला. सलामीवीर शुभमन गिल आणि सनवीर सिंग यांनी पंजाबच्या संघासाठी सलामी दिली. दरम्यान, या सामन्यात शुभमन गिल याला पंचांनी बाद दिल्यानंतर तो भडकला. तसेच गिल याने पंचाच्या निर्णयाचा विरोध करत मैदान सोडण्यास नकार दिला. परिणामी, पंचानी आपल्या निर्णयात बदल केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराने ट्विटरवर सामन्यावेळी झालेल्या वादाबद्दल माहिती दिली. मैदानात पंचानी पंजाबचा सलामीवीर शुभमन याला बाद दिल्यामुळे त्याला राग आला. बाद नसताना पंचानी त्याला बाद दिले, यामुळे गिलने पंचानी दिलेल्या निर्णयाचा विरोध करु लागला. एवढेच नव्हेतर, मैदान सोडण्यास स्पष्ट नकार दिला. पंच म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतलेले उतरे पाठक यांनी बाद केल्यानंतर गिलने त्यांना अपशब्द वापरले. दिल्लीतील कर्णधार नितीश राणा म्हणाला की, शुभमन बाद दिल्यानंतर तो पंच पाठक यांच्याकडे गेला आणि त्यांना अपशब्द वापरले. शुभमनने पंचाच्या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर पंचानी आपला निर्णयात बदल केला. यामुळे दिल्ली संघाच्या खेळाडूने संताप करत पंचानी बदलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे देखील वाचा- India VS Srilanka T20 Match: जसप्रीत बुमराह याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, मलिंगाने काहीही शिकवले नाही!

या सामन्यात 20 वर्षीय शुभमन गिल 41 चेंडूंत 23 धावांची खेळी केली. या सामन्यात गिले ४ चौकार लगावले. सिमरजीत यांच्या गोलंदाजीवर अनुज रावत यांनी गिल याचा झेल घेतला. सध्या पंजाबचा संघ एलिट अ गटात असून पहिल्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत पंजाबकडे १७ गुण आहेत तर, दिल्लीने आतापर्यंत एकूण गुणांची नोंद केली आहे.