India vs West Indies राजकोट कसोटी: मुंबईच्या पृथ्वी शॉने पदार्पणातच ठोकले शतक
भारताने सध्या एक बाद १८२ रन्स केले असून शॉ १०२ आणि पुजारा ७४ रन्स वर खेळत आहे.
मुंबईच्या पृथ्वी शॉने आपल्या क्रिकेट पदार्पणातच शतक ठोकले आहे. भारत आणि वेस्ट इंडिसमध्ये राजकोट येथे पहिली कसोटी सुरु असून, भारताने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्वीकारली. के एल राहुल सुरवातीला बाद झाल्यानंतर शॉने चेतेश्वर पुजाऱ्याच्या साथीने दमदार फलंदाजी केली. १८ वर्षीय शॉने केवळ ९९ बॉल्स मध्ये शतक झळकावलं असून, त्याने आपल्या रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि टेस्टच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.
भारताने सध्या एक बाद १८२ रन्स केले असून शॉ १०२ आणि पुजारा ७४ रन्स वर खेळत आहे. शॉ भारताचा २९३ वा कसोटी खेळाडू बनला असून भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला कसोटी कॅप दिली. पृथ्वी शॉ पदार्पणातच शतक मारणारा भारताचा १५ वा खेळाडू ठरला असून त्याने मैदानाच्या चारही बाजूला दमदार शॉट्स लावले आहेत. विराट कोहली, संपूर्ण टीम आणि कोच रवी शास्त्रीने सुद्धा उभं राहून शॉच्या फलंदाजीला दाद दिली.