US Open 2020 Draw: सेरेना विल्यम्ससमोर विक्रमी ग्रँड स्लॅमसाठी कठीण ड्रॉ, भारताच्या सुमित नागलचा पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रैडली क्लैनशी सामना
सोमवारी न्यूयॉर्क येथे सुरू होणाऱ्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागलचा अमेरिकेच्या ब्रैडली क्लैनशी सामना होईल. सोमवारी न्यूयॉर्क येथे सुरू होणाऱ्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागलचा अमेरिकेच्या ब्रैडली क्लैनशी सामना होईल.
सोमवारी न्यूयॉर्क येथे सुरू होणाऱ्या यूएस ओपन (US Open) टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागलचा (Sumit Nagal) अमेरिकेच्या ब्रैडली क्लैनशी (Bradley Klahn) सामना होईल. कोरोना व्हायरसमुळे फ्रेंच ओपन पुढे ढकलण्यात आणि विम्बल्डन रद्द करण्यात आल्यानंतर आयोजित होणारे यूएस ओपन 2020 मधील दुसरे मेजर आहे. सध्या जगातील 122 व्या क्रमांकावर असलेल्या नागलचा 128व्या स्थानी असलेल्या क्लैनशी होईल आणि पहिल्या फेरीत त्याचा पराभव केल्यावर दुसऱ्या डेरीत त्याचा सामना द्वितीय मानांकित डोमिनिक थिम (Dominic Thiem) याच्याशी होऊ शकतो. द्वितीय मानांकित डोमिनिक थिमची लढत स्पेनच्या जगातील 104व्या क्रमांकाच्या जौमे मुनारशी होईल. यूएस ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळवणारा भारतीय क्रमांक 1 शेवटचा खेळाडू होता, ज्याची नवीन एटीपी क्रमवारीच्या आधारावर निवड झाली. (US Open 2020: भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉ मध्ये मिळाला प्रवेश; रोजर फेडरर, राफेल नडालची माघार)
गेल्या आठवड्यात नागाल प्रागमध्ये (Prague) स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले, जेथे क्वार्टरफायनल सामन्यात तीन वेळा मेजर विजेता स्टॅन वावरिंकाकडून पराभवाचा सामना करावा लागला. मागील वर्षी यूएस ओपनमध्ये 23 वर्षीय नागलने ग्रँड स्लॅममध्ये पदार्पण केले जेथे पहिल्या फेरीत रॉजर फेडररशी त्याचा सामना झाला. दरम्यान, अव्वल मानांकित नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) सोपा ड्रॉ मिळाला आहे. जोकोविचने पुढे फेरी गाठल्यास सेमीफायनलमध्ये अलेक्झांडर झ्वेरेव आणि फायनलमध्ये डोमिनिक थीमशी लढत होऊ शकते. जोकोविच चौथे यूएस ओपन आणि 18व्या ग्रँड स्लॅमसाठी प्रयत्नशील असेल, तर 24 व्या ग्रँड स्लॅम शोधात असलेल्या सेरेना विल्यम्सला (Serena Williams) कठीण ड्रॉ मिळाला आहे. जोकोविचचा फ्लशिंग मीडोज येथे पहिल्या सामन्यात बोस्नियाच्या दामिर दजुमहुरशी सामना होईल, तर तिसऱ्या फेरीत नंबर-28 जान लेनार्ड स्ट्रफशी लढाई होऊ शकते. गेल्या वर्षी उपविजेता डेनिल मेदवेदेव तिसऱ्या मानांकित असून अर्जेटिनाच्या फेडरिको डेलबोनिसशी पहिला सामना होईल. पाहा यूएस ओपनचा संपूर्ण ड्रॉ इथे
दुसरीकडे, महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्सचा पहिल्या फेरीत क्रिस्टी आह्नशी सामना होईल, पण तिसऱ्या फेरीत 2017 यूएस ओपन विजेती स्लोन स्टीफेंसशी आमना-सामना होण्याची शक्यता आहे. विल्यम्स घरातील सातवे स्लॅम जिंकण्याची प्रयत्नशील असेल आणि 24 व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचा पाठलाग करताना न्यूयॉर्कमध्ये मागील दोन फायनलसह विल्यम्सला अखेरच्या चार मोठ्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2020 10:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

