Sakshi Malik Announced Retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती; ब्रिजभूषण यांचे निष्ठावंत संजय सिंग यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केली घोषणा

निवृत्तीची घोषणा करताना साक्षी मलिक म्हणाली की, जो आज फेडरेशनचा अध्यक्ष झाला आहे. आम्हाला माहित होते की तो होईल...तो ब्रिजभूषणला मुलापेक्षाही प्रिय आहे... जो आतापर्यंत पडद्यामागे आहे. जे पडद्यामागे होते ते, आता उघडपणे होईल. आम्ही आमच्या लढ्यात यशस्वी होऊ शकलो नाही. आम्ही आमचा मुद्दा सगळ्यांना सांगितला. तो योग्य व्यक्ती नाही हे संपूर्ण देशाला माहीत असूनही, त्यांनी तसे केले नाही. मला माझ्या भावी पिढ्यांना सांगायचे आहे की, त्यांनी शोषणासाठी तयार रहावे.

Sakshi Malik (PC - Instagram)

Sakshi Malik Announced Retirement: 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आता मॅटवर लढताना दिसणार नाही. साक्षी मलिकने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंग (Sanjay Singh) भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षीने हा निर्णय घेतला. साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी माजी WFI प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ पुरुष कुस्तीगीरांनीही निदर्शने केली. साक्षी मलिक व्यतिरिक्त विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनीही फेडरेशनच्या निवडणुकीत संजय सिंग जिंकल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या 11 महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) गुरुवारी नवीन अध्यक्ष मिळाला. यापूर्वीच्या बॉडीमध्ये सहसचिव असलेले संजय सिंह नवे अध्यक्ष झाले आहेत. संजय सिंह हे फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय आणि सहकारी मानले जातात. तथापी, या निवडीनंतर साक्षी मलिकने एक मोठी घोषणा केली आहे. साक्षी मलिकने सांगितले की, ब्रिजभूषण सिंग यांच्या निकटवर्तीय संजय सिंग यांनी फेडरेशनच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कुस्ती सोडली आहे. (हेही वाचा - Sakshi Malik on Asian Games: आम्ही आशियाई खेळांमध्ये तेव्हाच सहभागी होऊ जेव्हा आमच्या समस्यांचे निराकरण होईल - साक्षी मलिक (Watch Video))

यावेळी साक्षी मलिक म्हणाली, 'कुस्तीपटूंनी डब्ल्यूएफआयमध्ये महिला अध्यक्षाची मागणी केली होती, पण ब्रिजभूषणची यंत्रणा किती मजबूत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मी आणि बजरंग पुनिया यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. आम्ही मुलींची नावे घेतली आणि त्यांना सांगितले की कुस्ती वाचवा. पण काहीही झाले नाही.'

येणाऱ्या पिढ्यांनी शोषणासाठी तयार राहावे - साक्षी मलिक

निवृत्तीची घोषणा करताना साक्षी मलिक म्हणाली की, जो आज फेडरेशनचा अध्यक्ष झाला आहे. आम्हाला माहित होते की तो होईल...तो ब्रिजभूषणला मुलापेक्षाही प्रिय आहे... जो आतापर्यंत पडद्यामागे आहे. जे पडद्यामागे होते ते, आता उघडपणे होईल. आम्ही आमच्या लढ्यात यशस्वी होऊ शकलो नाही. आम्ही आमचा मुद्दा सगळ्यांना सांगितला. तो योग्य व्यक्ती नाही हे संपूर्ण देशाला माहीत असूनही, त्यांनी तसे केले नाही. मला माझ्या भावी पिढ्यांना सांगायचे आहे की, त्यांनी शोषणासाठी तयार रहावे. (हेही वाचा - Wrestlers Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यावर गुन्हा दाखल, सर्व महिला आंदोलकांची सुटका)

पहा व्हिडिओ - 

 

क्रीडा मंत्रालयाने दिलेले वचन मोडले - बजरंग पुनिया

दरम्यान, बजरंग पुनिया यांनी म्हटलं आहे की, क्रीडा मंत्रालयाने डब्ल्यूएफआयच्या बाहेरची व्यक्ती फेडरेशनमध्ये येईल, असे आश्वासन दिले होते. संपूर्ण यंत्रणा ज्या पद्धतीने काम करत आहे, मला वाटत नाही की मुलींना न्याय मिळेल. आम्ही जे काही लढलो, त्यासाठी येणाऱ्या पिढीला आणखी संघर्ष करावा लागेल. सरकारने जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही.

तथापी, डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदावर संजय सिंह यांच्या विजयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नवी दिल्लीतील 21 अशोका रोड येथील निवासस्थानाबाहेरही काही पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर लिहिले होते- 'वर्चस्व आहे, वर्चस्व कायम राहील. देवाने हे दिले आहे.' याशिवाय साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर WFI चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे की, याचा माझ्याशी काय संबंध? मी यावर काहीही करू शकत नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now