पी.व्ही. सिंधू ठरली 'जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप' ची मानकरी, स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
सिंधू (P.V. Sindhu) 'जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप' (Badminton World Championship) ची मानकरी ठरली आहे. त्याचसोबत ही स्पर्धा जिंकरणारी सिंधू ही प्रथमच भारतीय खेळाडू आहे.
भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) 'जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप' (Badminton World Championship) ची मानकरी ठरली आहे. त्याचसोबत ही स्पर्धा जिंकरणारी सिंधू ही प्रथमच भारतीय खेळाडू आहे. या स्पर्धेत सिंधू हिने जपानची नोजोमी ओकाहुरा (Nozomi Okuhara) हिला पराभव करत विजय मिळवला आहे. त्यामुळे सिंधू हिला सुवर्णपदकाने गौरवण्यात आले आहे.
नोजोमी ओकुहारा हिच्या विरोधात सिंधू हिने 21-7, 21-7 अशा गुणांची खेळी करत विजय मिळवला आहे. तर जागतिक बॅडमिंटन चॅम्पीयनशीपवर नाव कोरणारी सिंधू हिने भारताचे नाव या पुरस्कारावर कोरले आहे.(लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सलग 90 तास सायकल चालवून पूर्ण केली फ्रान्सची सर्वात जुनी स्पर्धा, 56व्या वर्षी केला विक्रम)
तर शनिवारी सिंधू हिने चीनच्या चेन यू फेई हिला 21-7, 21-14 अशा फरकाने हरवत अंतिम फेरीत जाण्यासाठी विजयाची खेळी केली. तर आजच्या अंतिम फेरीमध्ये तिचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावरील नोजोमी ओकुहारा हिचे आव्हान होते. मात्र सिंधू हिने उत्तम खेळी करत तिला सुद्धा हरवत विजय मिळवला आहे.