Pro Kabaddi League 2019: Puneri Paltan वर मात करत Haryana Steelers ने पहिल्याच सामन्यात मारली बाजी

प्रो कबड्डी लीग 2019 मधील पहिल्याच सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटणवर मात करत यशाची मुहर्तमेढ रोवली.

Pro Kabaddi League 2019: Puneri Paltan वर मात करत Haryana Steelers ने पहिल्याच सामन्यात मारली बाजी
Pro Kabaddi League 2019 | Puneri Paltan vs Haryana Steelers | (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीग 2019 (Pro Kabaddi League) मधील पहिल्याच सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटणवर मात करत यशाची मुहर्तमेढ रोवली. आज (22 जुलै) रंगलेल्या पुणेरी पलटन (Puneri Paltan) विरुद्ध हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) या सामन्यात 34-24 च्या फरकाने हरियाणाने बाजी मारली. हरियाणा टीममधील नवीन आणि सेल्वामणी यांच्या चढायांनी पुणे संघाची दाणादाण उडवून दिली. या चढायांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरलेला पुणे संघ बॅकफूटवर गेला. शुभम शिंदेने आपल्या खेळीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही फारशी कमाल करु शकला नाही. त्यामुळे पहिल्या सत्रात हरियाणाने 22-10 अशी आघाडी घेतली. (आज होणार Puneri Paltan vs Haryana Steelers मध्ये चुरशीची लढत)

दुसऱ्या सत्रात पुणे संघाने हरियाणा संघावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यात पवन कादीयान, मनजीत आणि शहाजी जाधव यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मात्र बचावफळीतल्या समन्वयाचा अभावामुळे हरियाणा संघाला 34-24 अशी आघाडी घेण्यात यश आले आणि अखेर हरियाणा संघ विजयी ठरला. (Pro Kabaddi League 2019: Jaipur Pink Panthers ची विजयी सुरुवात; U Mumba संघावर मात)

प्रो कबड्डी ट्विट:

प्रो कबड्डीमधील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून यात पुण्यावर हरियाणा संघाने मात करत स्पर्धेची यशस्वी सुरुवात केली.



संबंधित बातम्या

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण

South Africa vs Pakistan 2nd Test 2025 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचे मालिका काबीज करण्याचे उद्दिष्ट; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Australia vs India 5th Test 2025 Live Streaming: ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून

Australia vs India 5th Test 2024: पाचव्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल; मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टरला संघात स्थान