Pro Kabaddi League 2019: अटीतटीच्या सामन्यात दबंग दिल्ली चा तामिळ थलायवाज संघावर एक गुणाने विजय

या सामन्यात अखेरच्या क्षणाला पाईंट मिळत दबंग दिल्लीने तमिळ थलाइवाजवर 30-29 ने मात केली

Dabang Delhi (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या सातव्या सीजनमधील 9 वा सामना आज (25 जुलै) दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि  तामिळ थलायवाज (Tamil Thalaivas) यांच्यात रंगली. या सामन्यात अखेरच्या क्षणाला पाईंट मिळवत दबंग दिल्लीने तामिळ थलायवाजवर 30-29 ने मात केली. हैद्राबादच्या गाचीबावली इंडोर स्टेडिअमवर हा सामना रंगला.

सामना सुरु होताच तामिळ थलायवाज संघाने वर्चस्व प्रस्थापित केले आणि पहिल्या सत्रात 7 पाईंट्सने लीड घेतली. पहिल्या सत्रात सामना तमिल थलाइवाज संघाच्या पक्षात होता. (Pro Kabaddi League 2019: Jaipur Pink Panthers ची विजयी सुरुवात; U Mumba संघावर मात)

दुसऱ्या सत्रात देखील तामिळ थलायवाज संघाने आघाडी कायम ठेवली होती. मात्र शेवटच्या पाच मिनिटांत दिल्लीने झटपट पॉईंट्स मिळवत सामना 29-29 असा बरोबरीत आणला. मात्र दिल्लीचा नवीन कुमार शेवटची चढाई करत असताना तामिळ थलाइवाज संघाचा मंजीत छिल्लर स्वचुकीमुळे आऊट झाला आणि दिल्ली संघाला एक गुण मिळाला.

प्रो कबड्डी ट्विट:

दबंग दिल्लीकडून सर्वाधिक पॉईंट्स नवीन कुमार याने घेतले आणि आपल्या टीमचा विजय मिळवून दिला. याशिवाय मेराज शेख आणि जोगिंदर नरवाल यांनी अनुक्रमे 6 व 4 पॉईंट्स मिळवले.

तामिळ थलायवाज संघाकडून राहुल चौधरी याने सर्वाधिक म्हणजेच 7 पॉईंट्स मिळवले. तर कर्णधार अजय ठाकूर आणि मंजीत छिल्लर यांनी प्रत्येकी 5-5 पॉईंट्सची कमाई केली. (Pro Kabaddi League 2019: Puneri Paltan वर मात करत Haryana Steelers ने पहिल्याच सामन्यात मारली बाजी)

दबंग दिल्लीचे आतापर्यंत दोन सामने झाले असून दोन्ही सामने जिंकत त्यांनी 10 पॉईंट्स मिळवले आहेत. तर तामिळ थलायवाज संघाचे देखील दोन सामने झाले असून त्यातील एक सामना जिंकत त्यांनी 6 पॉईंट्सची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत दबंग दिल्ली संघ अव्वल स्थानी आहे.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif