Pro Kabaddi 2019: यु मुंबा कडून गुजरात फॉर्च्यून जायंट्स चा 31-25 ने पराभव, गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप
प्रो कबड्डी लीग 2019 च्या 102 व्या सामन्यात यु मुंबा संघाने गुजरात फॉर्च्यून जायंट्स ला 30-25 ने पराभूत केले. या विजयासह यु-मुंबा 53 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आला. तर गुजरातला आजच्या मॅचपासून एक गुण मिळाला आहे आणि यासह त्यांनी पटना पायरेट्सला मागे टाकत 9 वे स्थान पटकावले आहे.
प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) 2019 च्या 102 व्या सामन्यात यु मुंबा (U Mumba) संघाने गुजरात फॉर्च्यून जायंट्स (Gujarat Fortunegiants) ला 30-25 ने पराभूत केले. या विजयासह यु-मुंबा 53 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आला. तर गुजरातला आजच्या मॅचपासून एक गुण मिळाला आहे आणि यासह त्यांनी पटना पायरेट्सला मागे टाकत 9 वे स्थान पटकावले आहे. मुंबई संघाच्या या विजयाचा अर्थ आहे की तामिळ थॅलेवास अधिकृतपणे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
पहिल्या हाफची सुरुवात फार हळू झाली आणि 3 मिनिटांत केवळ 2 गुण झाले. गुजरात फॉर्च्युन जायंट्सने सुरुवातीला आघाडी मिळवली. यानंतर यु-मुंबाने पुनरागमन केले आणि 10 व्या मिनिटाला आघाडी मिळवली. 11 व्या मिनिटाला मुंबाने गुजरातला ऑल आऊट करत मागे टाकले आणि 5 गुणांची आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर गुजरातने मुंबाला ऑलआऊट सामन्यात शानदार पुनरागमन केले. हाफ-टाइम पर्यंत स्कोअर 16-16 असा कायम राहिला. गुजरातकडून पहिल्या हाफमध्ये कर्णधार रोहित गुलियाने 9 गुण मिळवले, तर यु-मुंबासाठी अभिषेक सिंह याने 5 गुण आणि संदीप नरवाल याने 3 गुण मिळवले.
दुसऱ्या हाफमध्ये देखील दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळाली. 27 व्या मिनिटाला स्कोर 18-18 ने बरोबरीत होता. 30 व्या मिनिटापर्यंत कोणत्याही संघाकडे आघाडी नव्हती परंतु काही वेळाने यु-मुंबाने 3 गुणांची आघाडी घेतली. आणि 37 व्या मिनिटाला गुजरात संघाला ऑल आऊट करत आपला विजय निश्चित केला. अभिषेकसिंगने यू-मुम्बाकडून सुपर 10 घेलता, तर गुजरातकडून रोहितने 9 गुण मिळवले. दरम्यान, यु-मुंबाचा पुढील 27 सप्टेंबरला बेंगलुरू बुल्सविरुद्ध होईल. दुसरीकडे, गुजरात फॉर्च्यून जायंट्सची टीम आता आपला पुढील सामना 28 सप्टेंबरला तमिळ थालाइवासशी खेळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)