रोईंगपटू दत्तू भोकनळला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; आरोपांमध्ये तथ्य नसल्याने रद्द केला गुन्हा
त्यामुळे दत्तूच्या विरोधात 498 (A) कलमाखाली कौटुंबिक हिंसाचार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत हायकोर्टामध्ये गुन्हा रद्द करण्यात आला आहे.
भारताचा रोईंगपटू दत्तू भोकनळ (Dattu Bhokanal) याला मुंबई हायकोर्टातून (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये असलेल्या एका महिलेने दत्तू विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे दत्तूच्या विरोधात 498 (A) कलमाखाली कौटुंबिक हिंसाचार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत हायकोर्टामध्ये गुन्हा रद्द करण्यात आला आहे. दत्तू हा आंतरराष्ट्रीय रोइंगपटू आहे. भारतीय रोविंगपटू दत्तू भोकनळ याला जामीन मंजूर, महिला बायको असल्याचे सिद्ध
काय आहे प्रकरण?
तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, दत्तू भोकनळ व आपण (तक्रारदार महिला) डिसेंबर 2017 मध्ये आळंदी येथे विवाह केला. हा विवाह आपण दोघांनीच केला होता. बराच काळ आम्ही एकत्रही राहात होतो. आमच्या एकत्र राहण्याची दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. दरम्यान, आम्ही पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले. त्यासाठी दोन वेळा विवाह कार्यालयही बूक केले. मात्र, दोन वेळा कार्यालय बुक करुनही दत्तू त्या ठिकाणी आलाच नाही. त्यांनी विवाहाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. तक्रारदार महिलाही पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजते.
दोघांच्या सहमतीने झालेल्या विवाहानंतर दत्तूने आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचेही या तक्रारीत सांगण्यात आले आहे.