Jake Paul Beat Mike Tyson: जेक पॉलचा माईक टायसनवर विजय; 8 फेरीच्या सामन्यात दाखवली दमदार कामगिरी, बक्षिसाची रक्कम ऐकून डोके चक्रावले

हा सामना 8 फेऱ्यांपर्यंत सुरू होता. ज्यामध्ये पॉलने माइक टायसनचा 4 गुण जास्त मिळवत पराभव केला.

Photo Credit- X

 

Jake Paul Beat Mike Tyson: बॉक्सिंगच्या जगात प्रसिद्ध नाव असलेल्या जेक पॉलने (Jake Paul) अनुभवी बॉक्सर माईक टायसनला ( Mike Tyson) पराभूत करून आपली ताकद आणि कौशल्य दाखवून दिले. हा सामना 8 फेऱ्यांपर्यंत चालला, ज्यामध्ये पॉलने माइक टायसनचा 4 गुण जास्त मिळवत पराभव केला. जेक पॉलने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक वृत्ती दाखवली. प्रत्येक फेरी दोन मिनिटांची होती. पहिल्या फेरीत पॉलला 9 गुण आणि टायसनला 10 गुण (Jake Paul vs Mike Tyson,) दिले. त्याच वेळी दुसऱ्या फेरीतही पॉलला 9 गुण आणि टायसनला 10 गुण दिले. मात्र, त्यानंतर तिसऱ्या ते आठव्या फेरीत पंचांनी पॉलला 10-10 गुण दिले, तर टायसनला 9 गुणांवर समाधान मानावे लागले. अशा प्रकारे पॉलला 78 आणि टायसनला 74 गुण मिळाले.

संपूर्ण सामन्यात पॉलने 278 पंच मारण्याचा प्रयत्न केलाय त्यापैकी 78 पंच अचूक होते. रिपोर्ट्सनुसार, या विजयानंतर जॅक पॉलला बक्षीस रक्कम म्हणून 40 मिलियन डॉलर्स दिले जातील. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 338 कोटी आहे. टायसनला 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर (168 कोटी रुपये) दिले जातील. (Jake Paul vs Mike Tyson: जेक पॉल विरुद्ध माइक टायसन; जबरदस्त बॉक्सिंग सामना, जगभरातील चाहत्यांमध्ये उत्सुकता)

ताकद आणि अनुभवासाठी ओळखला जाणारा माईक टायसन या सामन्यात सुरूवातीपासून संघर्ष करताना दिसला. टायसनने त्याच्या अनुभवाच्या जोरावर जेक पॉलला कडवी झुंज दिली असली तरी, पहिल्या दोन फेऱ्यांनंतर टायसन थकलेला दिसत होता. वयाने त्याला वेठीस धरले असे वाटत होते, पण तरीही तो आठव्या फेरीपर्यंत आपल्या उभा राहिला. ही विजय मिळवून जॅक पॉलने बॉक्सिंगच्या विश्वात मोठी कामगिरी केली आहे.

या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते, त्यावेळी टायसनने जेक पॉलला कानाखाली मारली होती. त्यानंतर सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. मात्र, सामन्यानंतर पॉलने टायसनचे त्या थप्पडबद्दल आभार मानले. सामना संपल्यानंतर टायसननेही पॉलचे अभिनंदन केले आणि त्याला मिठी मारली.