EURO 2020 Semi-final: पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनला पराभूत करत इटलीचा फायनल सामन्यात प्रवेश, आता उत्सुकता डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड लढतीची

तथापि, रोमांचक सामन्यात इटलीने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. अंतिम सामन्यात इटलीचा सामना डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड संघातील दुसर्‍या उपांत्य सामन्याच्या विजयी संघाशी होईल.

इटली विरुद्ध स्पेन युरो 2020 सेमीफायनल (Photo Credit: Twitter)

Italy vs Spain EURO 2020: यूरो कप 2021 च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इटली आणि स्पेन एकमेकांना भिडले होते. पुन्हा एकदा इटली आणि स्पेन समोरासमोर आले, तेव्हा जगभरातील फुटबॉलप्रेमींचे डोळे या सामन्यावर टिकून होते. तथापि, रोमांचक सामन्यात इटलीने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. लंडनच्या वेम्बली स्टेडियम येथे हा सामना ख्रळण्यात आला होता. सामना अतिरिक्त वेळेत 1-1 ने बरोबरीत सुटला होता आणि निर्णय पेनल्टी शूटआऊटने घेण्यात आला. इटली अंतिम सामन्यात पोहोचली असून आता त्याचा सामना डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड संघातील दुसर्‍या उपांत्य सामन्याच्या विजयी संघाशी होईल.

इंग्लंडने 1996 नंतर पहिल्यांदा यूरो कपची सेमीफायनल फेरी गाठली आहे आणि आता वेम्बली स्टेडियमवर घरच्या मैदानावर त्यांचा सामना इन-फॉर्म डेन्मार्कशी होणार आहे. इटली-स्पेन यांच्यातील सेमीफायनल सामन्याची लढत धाकधूक वाढवणारी राहिली. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटची वेळ ओढावली तेव्हा बचावासाठी ओळखला जाणारा इटली संघ स्पेनवर मात करतो की काय असे वाटू लागले होते आणि तसेच झाले देखील. अटीतटीच्या सामन्यात अखेर इटलीने रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित केलं. इटलीसाठी जोर्गीन्होने निर्णायक पेनल्टी गोल केला. मॅन्युएल लोकेटेली आणि डॅनि ओल्मो अनुक्रमे इटली आणि स्पेनकडून सलामीचा गोल करण्याची संधी गमावली. त्यानंतर अ‍ॅन्ड्रिया बेलोट्टीने शूट-आउटमध्ये इटलीला आघाडी मिळवून दिली. स्पेनकडून जेरार्ड मोरेनो आणि थियागो अलकंटाराने गोल केले पण डोन्नारुम्मा गोल करण्यात अपयशी ठरला.

इटली आणि स्पेन चौथ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपच्या बाद फेरीत आमनेसामने आले होते. दरम्यान यूरो 2020 लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर 12 जुलै (सोमवार) रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif