India vs Germany Hockey Series 2024: जर्मनीविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारतीय हॉकी संघ दिल्लीत दाखल; 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी रंगणार सामना

23 आणि 24 ऑक्टोबर रोजी सामने होणार आहेत. मालिकेपूर्वी भारतीय हॉकी संघ दिल्लीत दाखल झाला आहे.

Photo Credit- X

India vs Germany Hockey Series 2024: जर्मनीविरुद्धच्या आगामी द्विपक्षीय मालिकेपूर्वी भारतीय हॉकी (India vs Germany Hockey) संघ रविवारी दिल्लीत दाखल झाला. मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भारतीय पुरुष हॉकी संघ जर्मनीविरुद्ध खेळणार आहे. पॅरिस 2024मध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले होते. आता भारताचा सामना 23-24 ऑक्टोबर रोजी ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या संघाविरुद्ध होईल. दिल्लीत पोहोचताच कर्णधार हरमनप्रीत सिंगने(Harmanpreet Singh) आगामी द्विपक्षीय मालिकेतील जर्मनीविरुद्धचे सामने चांगले होतील, अशी आशा व्यक्त केली.

उपकर्णधार विवेक सागर प्रसाद असेल. दुखापतग्रस्त मिडफिल्डर हार्दिक सिंग या मालिकेत खेळू शकणार नाही. या द्विपक्षीय मालिकेतून राजिंदर सिंग आणि आदित्य अर्जुन लगाटे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहेत. हरमनप्रीत सिंगने एएनआयला सांगितले की, 'जर्मनीचा संघ मजबूत आहे. आम्ही खेळलेल्या शेवटच्या चार ते पाच सामन्यांमध्ये आम्ही वर्चस्व राखले आहे... आम्हाला दोन्ही संघांमध्ये चांगला सामना होण्याची आशा आहे.'(हेही वाचा: ICC Women's T20 World Cup: महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा 'असा' होता प्रवास; पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला चारली होती धूळ)

मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भारताने शेवटची हॉकी वर्ल्ड लीग फायनल - पुरुष फेरी 4 जानेवारी 2014 मध्ये खेळली होती. याआधी सप्टेंबरमध्ये, भारताने यजमान चीनचा 1-0 असा पराभव करून पाचव्यांदा पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यापूर्वी 2011, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. त्या सामन्यात भारतीय फॉरवर्ड्स चीनच्या डिफेंडर्ससमोर झुंजत असताना भारताने 1-0 असा विजय मिळवला होता. भारताच्या हॉकी संघाने जर्मनीविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी २२ सदस्यीय संघाची घोषणा केली.

जर्मनीविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

गोलकीपर: कृष्ण बहादूर पाठक, सूरज कारकेरा

डिफेंडर: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, संजय, सुमित आणि नीलम संजीव जेस

मिडफिल्डर: मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), विष्णू कांत सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, मोहम्मद. राहिल मौसीन, राजिंदर सिंग फॉरवर्ड्स, मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif