Happy Diwali 2020 Wishes: पीटी उषा, विराट कोहली, सुरेश रैनासमवेत क्रीडापटूंनी चाहत्यांना दीपोत्सवाच्या शुभेच्छा

दिवाळी उत्साहात देशभर साजरी केली जात आहे. लोकं सोशल मीडियावर आपल्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रातील स्टार खेळाडू-सैना नेहवाल, युजवेंद्र चहल, सचिन तेंडुलकर ते विराट कोहली समवेत खेळाडूंनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. दिवाळीनिमित्त भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल, त्याचा साथीदार नवदीप सैनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दिवाळी 2020 शुभेच्छा (Photo Credits: File Image)

Happy Diwali 2020 Wishes: दिवाळी (Diwali) उत्साहात देशभर साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरस देशासह जगभरात पसरला असल्याने यंदा दिवाळी सर्वजण आपापल्या घरी साजरी करत असले तरी अनेक लोकं सोशल मीडियावर आपल्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. इतर सेलिब्रिटींसारख्या क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी ट्विटरवर जाऊन त्यांच्या चाहत्यांना दीपोत्सवाच्या (Dipotsav) निमित्ताने शुभेच्छा शेअर केल्या. “सर्वांना आनंदी, आणि सुरक्षित दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास चांगले आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यश लाभो. चांगले काळ परत येऊ दे आणि जगात शांती व ऐक्य निर्माण होवो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,” ट्विट माजी ऑलिम्पिक ट्रॅक अँड फील्ड अ‍ॅथलीट पीटी उषा (PT Usha) यांनी ट्विट केले. भारतीय क्रीडा क्षेत्रातील अन्य स्टार खेळाडू-सैना नेहवाल, युजवेंद्र चहल, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ते विराट कोहली (Virat Kohli) समवेत खेळाडूंनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. (लक्ष्मी देवीची कृपादृष्टी कायम राहावी यासाठी कसे कराल लक्ष्मी पूजन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)

दिवाळीनिमित्त भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल, त्याचा साथीदार नवदीप सैनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू सुशील कुमार आणि भारताच्या एमएमए फाइटर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

पीटी उषा

सायना नेहवाल

विराट कोहली

सुशील कुमार

रितू फोगाट

युजवेंद्र चहल

नवदीप सैनी

सुरेश रैना

किरेन रिजिजू

कोरोना व्हायरसमुळे सामान्य जीवनावर परिणाम होत असल्याने, सरकारने सामाजिक अंतर आणि मास्क घालून असे नियम पाळावे आणि सण साजरा करण्याचा सल्ला दिला. लोकांना मोठमोठे मेळावे टाळण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement