EURO 2020 Semi-final: इंग्लंडची 55 वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात, Harry Kane याच्या गोलने डेन्मार्कचा 2-1 असा पराभव; फायनलमध्ये Italy संघाशी लढत
डेन्मार्क आणि यजमान इंग्लंड यांच्यातील युरो कप फुटबॉल चॅम्पियनशिपचा दुसरा सेमीफायनल सामना बुधवारी रात्री लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने अतिरिक्त वेळेत डेन्मार्कचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या1992सह इंग्लंडने सेमीफायनल फेरीतील वारंवार झालेल्या पराभवाचा दुष्काळ संपवला आणि 55 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
EURO 2020 Semi-final: डेन्मार्क आणि यजमान इंग्लंड यांच्यातील युरो कप फुटबॉल चॅम्पियनशिपचा दुसरा सेमीफायनल सामना बुधवारी रात्री लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने अतिरिक्त वेळेत डेन्मार्कचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या1992सह इंग्लंडने सेमीफायनल फेरीतील वारंवार झालेल्या पराभवाचा दुष्काळ संपवला आणि 55 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 1992यूरो कप चॅम्पियन बनलेल्या डेन्मार्कच्या संघाने या सामन्यात काही विशेष सुरुवात केली नव्हती. पहिल्या हाल्फमध्ये 20 मिनिटांपर्यंत इंग्लंडचे वर्चस्व दिसून आले, ज्यादरम्यान टीमने अनेकवेळा डेन्मार्कच्या बाजूला आक्रमक फुटबॉल खेळला परंतु डेन्मार्कला 30 व्या मिनिटाला फ्री किक मिळाली आणि त्यांनी त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. (EURO 2020 Semi-final: पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनला पराभूत करत इटलीचा फायनल सामन्यात प्रवेश)
डेन्मार्कला बॉक्सच्या बाहेर मिळालेल्या फ्री किकवर माइकल डॅमसगार्डने गोलमध्ये रुपांतर केले आणि आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जेव्हा पहिल्याच हाफमध्ये डेनमार्क पुढाकार घेईल असे दिसत होते तेव्हा डेनमार्कचा कर्णधार सिमोन क्येरने नऊ मिनिटांनंतर आपल्याच गोलमध्ये गोल केला. या आत्मघाती गोलच्या जोरावर इंग्लंडला 1-1 अशी मिळाली जी पहिल्या हाल्फपर्यंत कायम राहिली. दुसर्या हाफमध्ये दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले पण दोन्ही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर सामन्यात अतिरिक्त वेळ वाढला जिथे 30 मिनिटांच्या खेळात अंतिम फेरीत कोण जाईल हे ठरवले जाते किंवा बरोबरी झाल्यास पेनल्टीद्वारे निर्णय घेतला जाईल. परंतु तसे झाले नाही, कारण अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धात इंग्लंडला पेनल्टी मिळाली आणि कर्णधार हॅरी केनने या पेनल्टीवर गोलरक्षक श्माइकलच्या उत्कृष्ट बचाव असूनही त्याने रिबाउंडवर गोल करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या क्षणात इंग्लंडने जास्तीत जास्त वेळ बॉल आपल्याकडे ठेवला आणि सामन्याचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला.
आता अंतिम सामन्यात इंग्लंडचा सामना इटलीशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. डेन्मार्कविरुद्ध या निर्णायक सामन्यात कर्णधार हॅरी केनने मोठा पराक्रम केला. केन गॅरी लाइनकरसह प्रत्येकी 10 गोल करत प्रमुख टूर्नामेंट्समध्ये (युरो आणि विश्वचषकात) सर्वाधिक गोल नोंदवणारा इंग्लंडचा संयुक्त आघाडीचा फुटबॉलर ठरला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)