धावपटू द्युती चंद हिने परराष्ट्रमंत्र्यांकडे अपील केले, युरोपीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी व्हिसासाठी Twitter वरून केली मदतीसाठी विनंती

File Photo of Dutee Chand

भारताची स्टार धावपटू द्युती चंद (Dutee Chand) हिने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांना युरोपियन स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी व्हिसा देण्याची विनंती केली आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिला २वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे. विश्व युनिव्हर्सिटी गेम्सच्या (World University Games) 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी देशाची पहिली महिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू असलेल्या दुती हिला आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने मान्यताप्राप्त 100 मीटर शर्यतीच्या दोन शर्यतींमध्ये भाग घ्यायचा आहे. ही शर्यत 13 ऑगस्टला आयर्लंडमध्ये आणि 19 ऑगस्टला जर्मनीमध्ये आयोजित केली जाणार आहे.

'आयर्लंड आणि जर्मनी येथे होणाऱ्या आयएएएफ स्पर्धांमध्ये मला सहभागी व्हायचं आहेयासाठी अद्याप मला व्हिसा मिळाला नाही, माझ्या व्हिसाची औपचारिकता काही कारणांमुळे पूर्ण झाली नाही. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाला मी विनंती करतो की लवकरात लवकर हस्तक्षेप करुन मला स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मदत करावी,' असं दुतीने ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारी दुती म्हणाली की टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता 100 मीटर शर्यतीसाठी 11.15 सेकंदाची पात्रता मिळवणे अत्यंत अवघड आहे. आणि ती साधण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. दुती टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या गुणापेक्षा अद्याप 0.17 सेकंद मागे आहे. तिची सर्वोत्तम वेळ 11.24 सेकंद आहे. 23 वर्षीय द्युतीला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. पण तिला यंदा हा पुरस्कार मिळू शकला नाही.